Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

वेश्याव्यवसायाची नैतिकता

ध
धनंजय
Tue, 03/11/2008 - 02:02
🗣 70 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 85979 views

🗣 चर्चा (70)
S
sunil kachure Mon, 05/30/2022 - 15:23 नवीन
उत्तम नियोजन केले तर देह विक्री व्यवसाय लं कोणाचा विरोध नाही. देहविक्री लं मान्यता म्हणजे गल्ली बोळात,रहिवासी इमारती ,सार्वजनिक जागा इथे विक्षपित चाळे करण्याची परवानगी नाही..
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 05/31/2022 - 06:47 नवीन
वेश्या व्यवसाय हा मानवी संस्कृतीने ठरवलेल्या नैतिकतेच्या चौकटीत कधीच बसणार नाही , पण म्हणून त्याचे कायदेशीर प्रमाणीकरण करू नये असे नाही, काही देशाचे नियम आजकाल गांजा कायदेशीर करत आहेत, मला तर ते चूक वाटते, मस्तिष्कावर प्रभाव पाडून पुढे अगदी हेवी मेटल पॉयझिंग देऊ शकणाऱ्या गांज्याला कायदेशीर करणे चूक वाटते, पण वेश्या व्यवसायाबद्दल विचार करता त्याला कायदेशीर करणे हे कैक लैंगिक आजार, गुप्तरोग, एचआयव्ही इत्यादींच्या प्रसारात एक उपायकारक खोडा म्हणून वापरले जाऊ शकते, वेश्यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप, त्यांना औषधपूरवठा, स्वच्छ ठिकाणे (व्यवसाय करावयास) ह्याने फक्त वेश्याच नाही तर वेश्यागमन करण्यासाठी जाणाऱ्या मंडळींचे पण स्वास्थ्यरक्षण होऊ शकेल, वरती काचुरे ह्यांनी वेश्या व्यवसाय, आई बहीण व्हिजिटिंग कार्ड वगैरे काय काय लिहिलेले आहे, ते पटले नाही दोन कारणांसाठी १. माझ्याच लेखनात वेश्या व्यवसाय हा मानवी नितीमूल्यांच्या चौकटीत नैतिक ठरणार नाही कधीच हे मी स्पष्ट म्हणतोय आणि त्यामुळे २. काचुरे ह्यांनी (कदाचित कोणालातरी प्रतिसाद म्हणून) वेश्याव्यवसायाची व्हाईट कॉलर सर्विस इंडस्ट्री सोबत केलेली तुलना. बाकी काय, वेश्याव्यवसाय कायदेशीर केला तर तो करताना जगातील कैक फसलेली, यशस्वी उदाहरणे ठेवता येतीलच अभ्यास करायला समोर.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/31/2022 - 08:53 नवीन
जगातील जास्त माहीत नाही पण भारतात खजुराव सारखी मंदिर आहेत तिथे . सेक्स ह्या विषयावर अनेक शिल्प कोरली आहेत. बघितले नाहीत पण ऐकून आहे. कामशास्त्र सारखे बाकी प्राचीन ग्रंथ पण आहेत त्याचा विषय सेक्स हाच आहे. . Evolution मुळे माणसाची प्रजाती निर्माण झाली असे दावे असले तरी.. संस्कृती, समाज व्यवस्था,निती अनिती. ह्यांची बरीच चक्र होवून गेली असावीत.. खुला सेक्स,नंतर निती मत्तेत सेक्स अडकला असेल. कोणाशी ही सेक्स करणे ह्याचा निती अनीती शी काही संबंध नाही. आणि कोणाशी ही सेक्स करणे ही अनीती. असे अनेक स्थित्यंतरे मानवी इतिहासात नक्कीच होवून गेली असणार. प्रतेक प्रकारचे चांगले वाईट परिणाम अनुभव नी माणसाला माहीत पडले असणार. म्हणून सेक्स लं निती मत्ते शी जोडले गेले असेल. एकच स्त्री संभोग करणे जी पत्नी आहे हे योग्य असे ठरवून कुटुंब व्यवस्था.आणि बाकी व्यवस्था. हे खूप अनुभवातून आलेले शहाणपण आहे. सेक्स चा संबंध अनेक गोष्टी शी आहे. संतती हा पहिला त्याचा प्रॉडक्ट आहे. त्याची जबाबदारी कोणावर तरी टाकणे अतिशय गरजेचे होते. म्हणून कुटुंब व्यवस्था आणि बाकी समाज व्यवस्था. सेक्स आणि भावनिक गुंतवणूक हा प्रश्न आहेच.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/31/2022 - 09:11 नवीन
बार मध्ये कमी कपडे घालून नाचणे,विविध लोकांचे स्पर्श सहन करणे. हे त्या व्यवसाय करणाऱ्या मुली खरेच मनापासून करत असतील का? हा प्रश्न मला नेहमी पडतो. साधे बस,ट्रेन मध्ये पण आपल्या बाजूला आपल्याला बरा वाटणारा च सहप्रवासी असावा अशी इच्छा सर्वांची असते. काही मिनिट किंवा तासाच्या प्रवासात पण आपल्याला बरा वाटणारा प्रवासी नसेल तर मन विचलित होते. बार गर्ल म्हणून काम करणाऱ्या मुलींची मानसिक अवस्था काय होत असेल. थंड डोक्याने विचार केला की जाणीव होईल. सेक्स वर्कर तर अजून खतरनाक. शारीरिक संबंध ठेवणे अशा व्यक्ती शी ह्याच्या शी काहीच ओढ नाही,आकर्षण नाही,इच्छा नाही. खुप कठीण काम आहे. मुली किंवा स्त्रिया ना ही अशी काम पोट पाणी चालण्यासाठी करावे लागत असेल तर आपल्या सिस्टीम मध्ये दोष आहे. पर स्त्री किंवा पर पुरुष ह्यांच्या शी आकर्षित होवून सेक्स करणे आणि. फक्त पैसे मिळतात म्हणून ओळख पण नसणाऱ्या व्यक्ती शी सेक्स करणे. खुप खुप फरक आहे. मानसिक त्रासाची परिसीमा आहे ती. आणि ह्या सर्व सेवांचे ग्राहक कोण तर पुरुष. पुरुषांना ऐश करण्यासाठी निर्माण झालेली गुलामगिरी ची एक पद्धत. ह्या मध्ये स्त्री चे हीत नाही. स्त्री लं कोणाशी ही तिच्या इच्छे नी सेक्स करायचा असेल तर तशी तिला परवानगी असावी हे वेगळे आहे . आणि पोटपण्यासाठी व्यवसाय म्हणून सेक्स करावा लागणे .हे वेगळे आहे. खुप फरक आहे ह्या मध्ये.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 05/31/2022 - 13:04 नवीन
आता हे पहा. मांजर आपल्या पिल्लांना केवळ तीन गोष्टी शिकवते: शिकार कशी करावी, कुणाला घाबरून रहावे आणि आपला बचाव कसा करावा (झाडावर चढणे, नखे पाजळणे इ.). याला फारतर 2 आठवडे लागतात. इतक्या शिक्षणावर मांजर आरामात आयुष्य जगू शकते. पण मानवाची उत्क्रांती इतकी जास्त झालेली आहे की समाजात केवळ जिवंत रहाण्यासाठी अफाट ज्ञानाची गरज पडते. पहा: भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, वाहतुकीचे नियम, कायदा, तंत्रज्ञान (किमानपक्षी दूरध्वनीचा वापर), लेखन-वाचन, सांस्कृतिक भान, पाककला, शेती, धर्मशास्त्र. ही यादी कितीही वाढवता येईल. हे इतके मूलभूत शिक्षण घेता घेता 18-20 वर्षे जातात. मानवाचे सरासरी आयुष्य 60-65 वर्षाचे असते. गुणोत्तर काढा. हे इतके ज्ञान आत्मसात करणे, साठवणे आणि वापरणे याकरिता मानवाला प्रचंड मोठा मेंदू विकसित करावा लागला. (मानवी मस्तक व शरीर यांचे गुणोत्तर काढा व त्याची इतर प्राण्यांशी तुलना करा. फरक लगेच उमजेल). मेंदूचा आकार हा असा भरपूर मोठा असल्यामुळे मुलांचा जन्म तुलनेत लवकर व्हावा लागतो. कारण मुलाचे डोके निसर्गाने जर मातेच्या पोटातच फार मोठे होऊ दिले तर माता आणि बाळ दोघे प्रसूतीतच मरतील. त्यामुळे मानवी अर्भके तुलनेत लवकर जन्माला येतात व जन्मानंतर वर्षानुवर्षे पालकांवर अवलंबून असतात (पशुपक्ष्यांचे असे नसते. कुत्रा साधारण 10-12 वर्षे जगतो. कुत्र्याची पिल्ले पंधरा ते वीस दिवसात जवळजवळ स्वयंपूर्ण होतात. गुणोत्तर काढा). अर्भकांची अशी प्रदीर्घकाळ देखभाल एकटीने करणे हे मानव मातेला केवळ अशक्य आहे. त्यामुळे पित्याने तिची साथ देणे सक्तीचे करण्यात आले (इतर प्राण्यांत माता आपली पिले एकटीने सांभाळते, किंबहुना पित्याला हाकलून लावते). आता हे पिल्लू माझेच आहे हा विश्वास पित्याला कसा व्हायचा? त्यामुळे कामनियम, योनिशुचिता, एकपतिव्रत ही बंधने आली. ही बंधने अंमलात आणण्यासाठी, तसेच मातापित्याला मुलांचे संगोपन, शिक्षण व रक्षण सुलभ व्हावे, म्हणून समाजव्यवस्था आली.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 05/31/2022 - 16:29 नवीन
आपल्या प्रतिसादातील काही त्रुटी १) मानवापेक्षा उत्क्रांतीत खालच्या पायरीवर असणारे प्राणी यांच्या डी एन ए मध्ये मोठ्या प्रमाणात उपजत बुद्धी (स्मरणशक्ती) साठवलेली असते. त्यामुळे कुत्रे, मांजरं गायी हरणं आणि त्यांच्या कुळातील सर्व प्राणी हे मातेचे दूध पिणे थांबवल्यावर उपजत बुद्धीने वासाने आपले अन्न शोधून काढून आपले पोट भरू शकतात. मानवाच्या मेंदूचा विकास झाला त्याबरोबर हि उपजत बुद्धी मागे पडली. याच बरोबर मानवी मेंदूची वाढ सुरुवातीच्या काळात फार झपाट्याने होते. पहिल्या सहा महिन्यात हि वाढ ६५ % आणि १ वर्षापर्यंत मानवी मेंदू प्रौढ माणसाच्या ७५ % आकाराचा आणि २ वर्षे पर्यंत ९० % आकाराचा होतो. २) हे हार्डवेअर वाढल्या नंतर त्यात सॉफ्टवेअर लोड होण्याची प्रक्रिया चालू होते जी जन्मभर चालूच राहते. ३) मानवी शरीराची वाढ १८ वर्षापर्यंत होत असते म्हणजेच मानवी मुलाचे बालपण हे १८ वर्षे इतके लांब असते. या काळात स्त्रीला बालकाच्या संगोपनासाठी पुरुषाची गरज भासत असते. आणि अशास्थितीत पुरुषाने हे मूल माझे नाहीच म्हणून जबाबदारी झटकली तर शेतीप्रधान व्यवस्थेत स्त्रीची स्थिती फार केविलवाणी होत असे. कारण बाहेर शेती सोडून दुसरे काम नाही. तेथे काम करताना मुलाचे संगोपन कसे करणार या शिवाय बलात्कार होण्याची आणि त्यातून पुढची संतती होण्याची शक्यता फार होती ज्यामुळे असलेल्याच नव्हे तर पुढच्या बालकाच्या पोषणाचीसमस्या निर्माण होत असे. या कारणास्तव जगभर सर्व समाजात यौनशुचिता ( नवऱ्याशी एकनिष्ठता) हि कल्पना जन्माला आली. आणि या कल्पनेचा विस्तार म्हणून लग्न संस्था निर्माण झाली. स्त्री स्वातंत्र्य हि कल्पना संतती प्रतिबंधक साधने आल्यानंतरच खरी फोफावू शकली आणि त्यानंतर आधुनिक जगात स्त्रीला नोकरी व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्यावर तिची खरी मुक्तीच्या दिशेने वाटचाल चालू झाली. स्त्रियांचे शोषण आदीम काळात कसे होत होते हे ज्यांना पाहायचे आहे त्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीतील स्त्रियांची स्थिती याचा जरूर अभ्यास करावा.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/31/2022 - 13:34 नवीन
सर्व प्रकार होवून गेले आहेत कोणाशी ही संभोग अगदी आई,बहिण ह्यांच्या शी पण(यम आणि यमी) प्राणी तर नाते पाळत नाहीत माणूस प्राणी च आहे. पण स्थिर जीवन,संतती चे पालन पोषण,स्त्री ची सुरक्षा, स्त्री साठी सुरक्षित वातावरण. पुरुष आक्रमक आहे हे नैसर्गिक आहे. पाणी नीतिमत्ता आणि परंपरा पुरुषांची आक्रमकता थोपवून ठेवतात. बहिण नागडी जरी दिसली तरी तिचा भाऊ हा पुरुष असून पण लैंगिक रित्या उत्तेजीत होत नाही का? ती स्त्री आहे हा पुरुष आहे तरी पण नाही. कारण नीतिमत्ता , समाज व्यवस्था त्या मुळे दहा वेळा फाशी असा कायदा केला असता आणि नीतिमत्ता आणि योग्य समाज व्यवस्था नसती तर . बहिण नागडी बघून भाऊ sexually उत्तेजीत झाला असता..... कायदे आणि शिक्षा ते थांबवू शकले नसते त्या मुळे देह विक्री चा संबंध मंद बुद्धी सारखा स्त्रियांच्या हक्क आणि स्त्री चे स्वतंत्र ह्याच्या शी मंद बुद्धी लोकांनी जोडू नये.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 05/31/2022 - 13:35 नवीन
चलत मुसाफिर, हा कळीचा मुद्दा आहे :
तसेच मातापित्याला मुलांचे संगोपन, शिक्षण व रक्षण सुलभ व्हावे,
तुम्ही वर जी कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष, मुखावगुंठित वगैरे विशेषणं ल्वापारली आहेत त्यांचा निर्देश मुलांच्या संगोपानाकडेच आहे. मात्र या गोष्टी आवश्यक असल्या तरी पुरेश्या नाहीत ( necessary but not sufficient ). बाप देखील नीतिवान असावा लागतो, पण तो मुद्दा वेगळा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 05/31/2022 - 14:04 नवीन
संगोपनात नीती आणि चारित्र्य कुठून उगवले? याचा संगोपनाशी काय संबंध? ज्ञानार्जन स्वसंरक्षण, परोपकार वगैरे ठीक आहे. नीतीमत्ता, चारित्र्य वगैरे गोष्टी म्हणजे धूर्त पुरुषसत्तेने आपला वरचष्मा अबाधित ठेवण्यासाठी काढलेली नसती टूम आहे. (या आता म्होरं. होऊनच जाऊ दे!) :-) :-)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 05/31/2022 - 20:12 नवीन
चलत मुसाफिर, संगोपनात नीती आणि चारित्र्य कुठून उगवलं, म्हणून काय विचारता ! वेश्यांना त्यांची अपत्यं त्याच वस्तीत राहावीशी वाटंत नाहीत. वेश्यांना त्यांच्या अपत्यांनी तोच धंदा केलेला आवडंत नाही. मुलगी असेल तर तीही वेश्या झालेली नको असते. मुलगा असेल तर मोठेपणी भ#वा झालेला नको असतो. भ#वा हा त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे. बाकी पर्याय कोणते ते विचारू नका. नीती व चारित्र्य म्हणजे काय ते वेश्यंना बरोब्बर ठाऊक आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 05/31/2022 - 13:52 नवीन
स्त्रीची सुरक्षितता हाही एक गंडलेला मुद्दाच. सुरक्षितता कोणापासून? पुरुषांपासूनच की हो! गुंडांनी दुकान फोडू नये म्हणून त्यांना हप्ता देण्यासारखेच हे झाले. असो. एकूण माझा मुद्दाच सिद्ध होतो: योनिशुचिता न पाळणारी, लिंगस्वातंत्र्य मानणारी स्त्री पुरुषसत्तेला महाप्रचंड धोक्याची घंटी वाटते. ती तशी वाटली नसती, तर सुरक्षितता वगैरे बागुवबुवे उभे करायची गरजच नव्हती.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/31/2022 - 14:13 नवीन
सुरक्षित ,स्थिर आयुष्य स्त्री आणि पुरुष दोघांचे. त्या साठी नियम आणि निती मत्ता . शारीरिक क्षमता काहीच वर्ष असते निसर्ग काही वर्षानंतर तारुण्य,शक्ती सर्व नष्ट करतो बालपणी चे १० ते १५ वर्ष आधार शिवाय जगता च येणार नाहीत माणसाच्या मुलाला. आर्थिक बाबतीत स्थिर होण्यास जी बुद्धी लागते ते शिक्षण आणि सुरक्षित निवारा. हा फक्त कुटुंब असेल तर च. आता बेरीज , वजा बाकी करा. स्वतःच्या शक्ती वर माणूस त्याच्या पूर्ण आयुष्यातील किती वर्ष जगू शकतो. स्त्री माणूस च आहे कोणती extra ordinary प्राणी नाही तिला हेच नियम लागू आहेत
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 06/11/2022 - 06:14 नवीन
रंधोंचे सर्व समाजस्वास्थ चे अंक आता ऑनलाईन उपलब्ध आहेत https://radhonkarve.com/ सर्व विषयवार आहे. तेथे वेश्या संबंधी लेख पहा
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/07/2024 - 16:57 नवीन
मी मराठी किडा वर वेश्यांच आयुष्य हा वृत्तपट पाहिला होता , तो शेअर करतोय. तुम्ही बाकी काही करु शकत नसला तरी त्यांच्याप्रति संवेदनशीलता ठेवा. विचार करा. धन्यवाद सूरज खटावकर, मराठी किडा व तेजस्वी सेवेकरी, सहेली संस्था https://www.youtube.com/watch?v=NIglFzYCE9U
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/08/2024 - 06:55 नवीन
खरं तर, महाराष्ट्रातील काही दिवसातील घटना पाहिल्या शाळकरी मुलींवरील झालेले अत्याचार, विक्रुत बापांनी मुलींवर केलेले अत्याचार, राजस्थानमधील अठ्ठावीस वर्ष वयाच्या मुलांनी बावन्न वय असलेल्या स्वतःच्या आईवर केलेले बलात्कार या सर्व घट्ना पाहिल्यावर विकृतीला धर्म नसतो तर, माणसातली विकृती असते आणि तिचा स्तर दिवसेंदिवस कोणत्या स्तराला चाललं आहे, ते लक्षात येतं आणि अशावेली वेशाव्यवसायाचं महत्व अधोरेखित व्हावं. वेश्या व्यवसाय काही त्यांनी आनंदाने स्वीकारलेला नसतो. परिस्थिती, अगतिकता, आणि असंख्य गोष्टी तो वेगळा विषय आहे. कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्त्या प्रकरणी बंगालमधील आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया असलेल्या वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिकच आहे. पिडितेला न्याय मिळावा म्हणून वेश्यांनी मोर्चात सहभाग घेतला झालेल्या बलात्कारांच्या घटनांनी त्याही व्यथित झाल्या आणि मोर्चामधे त्यांच्या हातातील घोषणा फलक होते- 'प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना' याचा अर्थ असा की तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करु नका'' ही सामाजिक जाणीव ऐतिहासिक आहे. या विषयावर प्रसिद्ध लेखक, समीर गायकवाड यांनी खुप लिहिलं आहे. खुप लिहिण्या-बोलण्यासारखं पण थांबतो. घाटपांडे साहेब मिपावर येत राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 09/08/2024 - 11:40 नवीन
माणूस दारू , तंबाखू शिवाय एकवेळ राहू शकतो परंतु पुरुष आणि स्त्रीला लैगिंक भूक आहे ती नैर्सगिक आहे , जिथे पुरुष स्त्री चे प्रमाण व्यस्त आहे तिथे हि भूक भागवण्याची सोय लागते ,, ती राजमार्गाने करण्याचाही सोय असेल तर त्यातील गुन्हेगारी कमी होते ( युरोपातील काही देश ) दोन्ही पुरुष वेश्या आणि स्त्री वेश्या उपलब्ध असणे असणे हे मला तरी अनैतिक वाटत नाही अनॆतिक काय तर लग्न बंधन किंवा अगदी लिव्ह इन रेलशनशिप मध्ये असताना वेश्यागमन करणे , येथे दोन्ही पुरुष आणि स्त्री हा नियम समान धरला आहे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 09/08/2024 - 18:31 नवीन
युपी: पेशंट ला ऍम्ब्युलन्स मधून नेत होते. ऍम्ब्युलन्स चालक आणि त्याच्या साथीदारांनी पेशंट च्या पत्नीचा लैंगिक छळ करायला सुरवात केली. आणि त्यासाठी पेशंट ला ऑक्सिजन मास्क काढून नंतर बाहेर फेकून दिले. एमपी: हिंदूंचे धार्मिक क्षेत्र उज्जैन. उज्जैन मध्ये भर दिवस, रस्त्यात, फुटपाथवर एका महिलेचा बलात्कार झाला. लोकं बघत बसली, काहींनी व्हिडिओ सुद्धा बनवले.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 09/09/2024 - 00:58 नवीन
एमपी: हिंदूंचे धार्मिक क्षेत्र उज्जैन. यात धर्म कुठे आला? एक नागरिक म्हणून या घटनेचा निषेध जरुर करा मग प्रत्येक गुन्ह्याचे वर्णन आपण " हिंदू बहुसंख्याक भारतात गुन्हा झाला " असे करणार का ? कॉ न्ग्रेस जेव्हा सत्तेत होतती तेव्हा हि देशची ८०% लोकसख्या हिंदूच होती आणि २०१४ पासून सुद्धा .. इतका द्वेष बरा नव्हे .. अर्थात तुमच्या नादाला कोण लागणार .. बसा लावत भीतीला तुंबड्या
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 09/09/2024 - 03:23 नवीन
चौकस 212 बरोबर सहमत. प्रत्येक गोष्ट धर्म जात पात याच्याशी जोडू नये. प्रसिद्ध वाक्य , गुन्हेगार गुन्हेगार असतो.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/10/2024 - 07:59 नवीन
प्रतिक्रिया देण्या अगोदर मूळ लेख व त्यावरील प्रतिसाद पुन्हा वाचावेत. लेख जुना असल्याने काही लिंक आत्ता चालत नाहीत पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही मात्र या विषयावर निर्भया प्रकरणानंतर 2013 साली मंगला सामंत यांचा लोकसत्तामधील लैंगिकतेचे शमन कि दमन? हा लेख व नंतर लैंगितेचे शमन हवेच हा एक लेख वैज्ञानिक दृष्टीकोन व सामाजिक दृष्टीकोन सांगणारा आहे त्यातील मुद्यांवर सध्या चर्चा होताना दिसत नाही हे मला ठळक पणे जाणवले. अनेक मानसशास्त्रीय पैलू या लेखात चांगले मांडले होते. जरुर वाचा. लैंगिकतेचे शमन की दमन? https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-or-aggression-36525/ मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 5 जाने 2013 लैंगिकतेचे शमन हवेच https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-is-needed-40206/ मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 12 जाने 2013 हे दोन्ही लेख तज्ञांनी आणि जिज्ञासूंनी जरुर वाचावेत. समीर गायकवाड यांचे खुलूस हे पुस्तक वेश्यांच्या जीवनावर आहे. ते ही आवर्जून विकत घेउन वाचावे. हा लेख व विषय समाजाचे लैंगिक व्यवस्थापन या मूळ विषयाचा भाग आहेत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 55 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा