>>मुरूड (जंजिरा) कडे जाताना रेवदंडा वाटेत लागते.
अर्रर्र, आत्ताच तर [म्हणजे ऑगष्टमधे] मुरुडला जाऊन आलो.
अगोदर कळलं असतं तर या गावात फिरलो असतो. :(
माहितीबद्दल धन्यु....!
-दिलीप बिरुटे
भटक्या, भाग्यवान आहेस लेका. मागल्या जन्मी पुण्य केलंन असली गावे तुझ्या नशीबी आलीत. हेवा वाटतोय तुझ्या भाग्याचा.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
वर्षा तून दोन तीन वेळा तरी रेवदंड्या ला जात असतो. दत्त शिखरावरुन दृश्य विलोभनिय असत. साळाव च्या खाडी पूला वर रात्री च्या वेळेस उभे रहा. इस्पात कारखान्या चे दिवे, कन्व्हेअर चे दिवे आणि पाण्यातले प्रतिबिम्ब बघण्या सारखे आहे. पुधे बिरला मंदिर अप्रतिमच आहे.
मस्तच आहेत फोटो.गोरखचिंचेचे झाड कर्हाड जवळ आमच्या कुलदेवतेचे मंदिर आहे त्या परिसरात आहे.इकडे मांडु म्हणुन एक पर्यटन स्थळ आहे (म्.प्र.)तिथे गोरखचिंचेची भरपुर झाडे बघितली.
धन्यवाद विमुक्त. लहान असताना नेहमी जाणं व्हायच. तुमच्या लेखामुळे कित्येक वर्षांनी पुन्हा सफर घडली. साळावला अप्रतिम चवीची खोबर्याची चिक्की/वड्या मिळायची. आता मिळते की नाही कुणास ठावूक.
शेवटचा मेसेज आवडला.
चौल-रेवदंडा ही जोडगावे. गच्च हिरव्यागार झाडांनी नटलेली. खाडीपलिकडे साळाव आणि कोरलई. कोरलईचा किल्ल्यावरूनदेखिल मस्त देखावा दिसतो. पूर्वी खाडीवर पूल नव्हता तेव्हा तरीतून जावे लागे. पूल झाला आणि मुरुडकडे जाणारी सगळी वाहतूक चौल-रेवदंडा मार्गे होऊ लागली. अरुंद रस्ता, रस्त्यावरच बसलेला बाजार, आणि त्यातून होणारी रहदारी!!
इथे मोठाली हॉटेले नाहीत पण जागोजाग घरगुती खाणावळी आहेत. त्यातून अत्यंत रुचकर जेवण (विशेषतः मत्स्याहारी) मिळते.
चौलमध्ये बहुधा एक रामाचेदेखिल मंदिर आहे. लगतच एक तलाव - त्याला बहुधा पुष्करणी म्हणतात.
छान लेख आणि फोटो.
जाताजाता - अलिबागमधील कुठल्याही दुकानात प्लॅस्टिकच्या पिशवीतून माल दिला जात नाही. उत्तम निर्णय - सर्वांनी पाळण्याजोगा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
रेवदंडाला जाऊन हे सगळे बघण्याची उत्सुकता निर्माण केलीस. ते गोरख चिंचेचे झाड पहायलाच हवे!
ह्या संस्थळाच्या निर्मितीत तुझा हातभार लागला आहे असे दिसते-
http://www.raanvata.com/kokan/revdanda/index.html
मस्त! पूर्वी साळावला जायला पुल नव्हता. त्याचे बान्धकाम चालले असताना, आम्ही मैत्रीणी तीथे फीरायला जायचो. त्याची आठवण झाली. आता ५ ता. ला दत्ताच्या यात्रेला जाणार आहोत.
मी पण चौल रेवदंड्याला गेलो आहे. चांगला ८-१० दिवस मुक्काम केला होता. सकाळी समुद्रावर क्रिकेट खेळून केळकरांकडे राईसप्लेट आणि दुपारच्या क्रिकेट आणि भटकंतीनंतर सामिष भोजन असा दिनक्रम होता ! विक्रम इस्पातचा प्लांट सुद्धा परवानगी काढून पाहिला होता !
लेख वाचून ते दिवस परत आठवले ! सुरेख लेखन !
छान लेख.
रेवदंड्याला फार पूर्वी काही दिवस राहिलो होतो, त्याची आठवण झाली. तेथे केळकरांची एक खानावळ होती. शाकाहारी जेवण छान मिळायचे. पण मर्यादित. एकदा जाम भूक लागलेली असताना लागोपाठ दोन राईस प्लेट खाल्या होत्या, ते आठवले. किंमत प्रत्येकी नऊ रुपये फक्त. त्या खानावळीसमोर एक मत्स्याहारी खानावळ होती. तिच्यात कोळंबीचे झणझणीत कालवण खाल्ले होते. झकासच.
कोकणातल्या अशा लहान लहान गावांत रहायला मजा येते.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
विमुक्ता, मस्तच रे....सुंदर आहेत फोटो...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
रेवदंड्यावरुन मुरुड-जंजिरा, अलिबागला बर्याच फेर्या झाल्या आहेत, पण रेवदंड्याला कधी खास थांबलो नाही. थांबावे अशी फार ईच्छा होते, पण कधी योग नाही आला.
पण अरूंद रस्त्यावरुन जाताना गर्द माडाची झाडी, समुद्राची गाज, लोभसवाणा सुर्यास्त वेड लावतो.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
रेवदंड्याची मस्तच सफर घडवून आणलीस रे! लग्गेच ह्या शनिवारी निघावे आणि रेवदंडा करुन यावे असे वाटू लागले पण तसे शक्य नसते ना? :( असो. तुझ्या चित्रातून बघायला मिळते हेही नसे थोडके.
चतुरंग
दोन वर्षापूर्वी मी अलिबाग परिसरातील चार किल्ल्यांचा ट्रेक केला होता, त्यावेळी शेवटचा किल्ला कोरलाईगड करण्याच्या आदले दिवशी रेवदंड्याला मुक्काम केला होता. रेवदंडा मला फारच आवडून गेलं.
माझ्या सुदैवाने मुक्कामाच्या दिवशी त्रिपुरी पोर्णिमा होती. त्यावेळी तिथल्या चौलच्या रामेश्वर मंदिरात आरास केलेली होती, समोर फटाक्यांची आतषबाजी, समोरच्या तळ्याच्या पाण्यात लोक दिवे / तरंगणार्या पणत्या सोडत होते, भोवताली अतिशय प्रसन्न वातावरण होतं. ते दृष्य अजूनही डोळ्यासमोर येतं.
पुढील त्रिपुरी पोर्णिमेला रेवदंडा-चौल आणि फणसाडचं अभयारण्य ह्या भटकंतीचं नियोजन आत्ताच करून ठेवलेलं आहे.
विमुक्त, तुमचा लेख आणि छायाचित्रण केवळ अप्रतिम.
मी एकदा पुणे-अलिबाग ते हर्णे-पुणे ८०० किमीची मोटरसायकल ट्रिप केली होती. तेव्हा अलिबाग, रेवदांडा, कोर्लई, मुरुड, जंजिरा असे बरेच पाहिले होते. छान आहे पोस्ट.
-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी