'एक वेस ओलांडली ' ही पण छान आहे कविता. त्यात शेवटी 'वेस एक ओलांडता गाव नवे दिसू लागले' हे एक कडवे फार छान वाटले.
मला तर फार आवडले. मला श्रीधर फडक्यांची ती संपूर्ण ध्वनिफीतच फार आवडते. त्यात सुधा 'तिला पाहीले मी नदीच्या किनारी' ही 'ग्रेस' यांची गूढ कविता तर मला फार आवडते.
'सृ.ला.'ताई आपण हा विषय इथे मांडून जुन्या आठवणी जागवल्या बद्दल आपले आभार.
पुण्याचे पेशवे
सृष्टिलावण्य,
एक उत्कृष्ट दर्जाचे रसग्रहण. या कवितेतील सौंदर्याचा, कारुण्याचा प्रत्यय आमच्यापर्यंत पोचविण्याबद्द्ल तुमचे अनेक धन्यवाद. असे म्हणतात की, प्रत्येक चांगली कविता रसिकाच्या मनात पुन्हा जन्म घेते. ही कविता कुठेतरी खोलवर तुम्हाला उमजली आहे. आज जेव्हा आम्ही हा लेख वाचतो तेव्हा ही कविता आम्हाला नव्याने भेटते. तिच्या रूपागुणाना तुमच्या रसिकतेचा सुगंध आता मिळाला आहे.
आपल्या प्रतिक्रिया वाचून छान वाटले. मनाला गोड गुदगुल्याच झाल्या म्हणा ना..
लेखिकेला प्रत्येक लेख आपल्या नवजात बाळाप्रमाणेच असतो. त्या बाळाचे कोणी कौतुक केले की अगदी झालेल्या लेखन-प्रसववेदना पण विसरायला होतात. असो.
खरे आभार प्रतिक्रिया न लिहिणार्यांचे कारण दाद द्यायलाच विसरणे ह्याहून सुंदर दाद ती कुठली?
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
सृष्टिलावण्य,
बाकी लोकांच्या प्रतिक्रिया नाही आल्या तर हिरमुसू नका. मी माझ्या अनुभवावरून सांगतो ; बर्याचदा मी उत्तमोत्तम गोष्टीना वेळेअभावी प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. मिसळपाव वात्रट, खट्याळ (आणि तात्यांभाषेत"खास" भाषेतल्या काही इरसाल शब्दांनी वर्णन करता येईल असेसुद्धा ) आहे ; पण कद्रू नाही. इफ् यू सिंग लाँग इनफ्, ऍड्मिरेशन विल फॉलो :-)
हम्म! रसग्रहण ठीक वाटले..
परंतु खरे पाहता माझ्या मते वरील लेखनाला रसग्रहण म्हणण्यापेक्षा विवेचन म्हणणे अधिक योग्य ठरेल!
भाषा अगदीच शालेय पुस्तकातली औपचारिक अशी वाटते आहे. वर्गात केवळ शिकवायलाच पाहिजे, टर्म किंवा सिलॅबस पुरे करायला हवे, या भावनेतून मास्तरीण बाई जसं शिकवतात तसं वाटलं!
असो,
पुढील लेखनास शुभेच्छा!
तात्या.
अहो आमच्या जन्मदात्याच्या म्हणण्यानुसार आम्ही फक्त शरीराने वाढलो आहोत पण बुध्दीने अजून शाळेत जाण्याच्याच लायकीचे आहोत. :) त्यामुळे ते माझ्यासारख्या शाळेतल्या मुलाना लगेच कळले.(ह.घ्या. :))
-शाळकरी(डॅनी)
पुण्याचे पेशवे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी