देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात अचानक उद्भवलेला तो अभूतपूर्व गोंधळ निव्वळ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे झाला, हे साधे आणि सोपे स्पष्टीकरण पटणारे नाही. पडद्यामागे काहीतरी मोठे, अदृश्य आणि धोरणात्मक सुरू होते का?
भारत जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक बदल करत असताना, देशातील सर्वात मोठ्या इंडिगो विमान कंपनीत एवढी मोठी अराजकता नेमकी त्याच वेळी का माजली? हा निव्वळ योगायोग मानावा, की यामागे काही गुप्त हेतू लपलेले आहेत, हा प्रश्न संशयाला जन्म देतो.
ज्या दिवशी देशाचे पंतप्रधान जागतिक शक्ती रशियाचे राष्ट्रप्रमुख पुतिन यांच्या स्वागतासाठी तयार असतात. त्यांच्यासोबत महत्त्वाचे आंतर-सरकारी करार करण्यासाठी दिल्लीत तयारी होते...
नेमक्या त्याच दिवशी, सकाळी १० वाजल्यापासून माध्यमांचे संपूर्ण लक्ष त्या ऐतिहासिक भेटीवरून आणि भारताच्या वाढलेल्या जागतिक प्रभावावरून हटवून, विमानतळांवरील गोंधळावर केंद्रित झाले. हा नक्की योगायोग आहे? देशात जागतिक स्तरावरील घटना घडत असतांना, देशाची प्रतिमा खालवलेली दाखवण्याची ही एक सोची समझी खेळी तर नव्हती?
या कंपनीला १८-२० महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची जाणीव होती, तरीही त्यांनी 'फ्लाइट्स'ची तिकीट विक्री चालू का ठेवली? प्रवाशांना वेळेवर माहिती न देता त्यांना विमानतळांवर एकत्र जमवून, माध्यमांना मोठी ब्रेकिंग न्यूज पुरवण्याची ही योजनाबद्ध तयारी तर नव्हती?
हा गोंधळ जाणीवपूर्वक इतका वाढू दिला गेला का? जेणेकरून राष्ट्रीय पातळीवर तीव्र संताप आणि सार्वजनिक गदारोळ निर्माण होईल.
या गोंधळामागील एक प्रमुख लपलेला उद्देश ने लागू केलेले नवे, कठोर नियम मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणणे हा असू शकतो. नवीन नियमांमुळे कंपनीला मोठ्या संख्येने भरती करावी लागणार होती. या नियमांचा सर्वाधिक फटका इंडिगोला बसणार होता, कारण त्यांच्या अनेक विमानांचे उड्डाण मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळेत होते. हा गोंधळ जाणीवपूर्वक निर्माण करून, कंपनीने डीजीसीएवर हे नियम मवाळ करण्यासाठी किंवा पूर्णपणे मागे घेण्यासाठी 'आर्म-ट्विस्टिंग' (दाबतंत्राचा) वापर केला. दुसरीकडे, लहान एअरलाईन्स या गोंधळामुळे बाजारात टिकू शकत नाहीत आणि अशा परिस्थितीत इंडिगोची मक्तेदारी अधिक मजबूत होते. थोड्या वैमानिकांच्या कमतरतेमुळे शेकडो उड्डाणे रद्द होतात, हे लॉजिक सामान्य माणसाला पटणारे नाही. याचा अर्थ हा 'अपघात' कमी आणि 'सिस्टीम जाणीवपूर्वक निकामी' करण्याची रणनीती अधिक वाटते.
या कंपनीच्या धोरणांवर परदेशी व्यक्ती आणि काही खास संस्थांचा प्रभाव आहे का, हा देखील एक गंभीर प्रश्न आहे. इंडिगोच्या सीईओपदी एका व्यक्तीची नियुक्ती झाली आहे. तसेच, डीजीसीए ने इंडिगोला एका तुर्की एअरलाइनकडून विमाने आणि क्रू भाड्याने घेण्यास मंजुरी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणात तुर्की आणि भारताचे संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत. अशा परिस्थितीत, राष्ट्रीय सुरक्षेला महत्त्वाच्या असलेल्या विमान कंपनीला तुर्की एअरलाइनकडून मदत घेणे किती सुरक्षित आहे? केवळ 'एक्सपर्ट' म्हणून कोट्यवधी रुपयांचे पगार देऊन परदेशी व्यक्तींना कंपनीत महत्त्वाच्या पदांवर का नियुक्त केले जाते? जुन्या निती आयोगाचे लोक आता या कंपनीत बसलेले आहेत असे बोललले जाते? हे लोक आपल्या स्वार्थासाठी 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या धर्तीवर धोरणे राबवून देशाचे (अ)हित तर साधत नाहीत ना, अशी शंका घेणे चुकीचे ठरेल का?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील 'बाबू'शाही या सगळ्याकडे डोळेझाक करत होती का? कंपनी नियमांचे उल्लंघन करत आहे, हे डीजीसीए ला माहीत नव्हते?
शेवटी पंतप्रधानांनी हस्तक्षेप केल्यावरच ‘शो कॉज नोटीस’ दिली गेली, म्हणजे नियामक संस्था स्वतःहून कृती का करत नव्हती? डीजीसीए सारख्या महत्त्वाच्या पदांवर विमान वाहतूक क्षेत्राचे विशेष ज्ञान असलेले तज्ज्ञ अधिकारी असावेत, की केवळ 'आयएएस' अधिकारी आहेत म्हणून त्यांची नियुक्ती करावी? जर क्षेत्राचे डोमेन ज्ञानच नसेल, तर खासगी कंपन्यांच्या कारभारावर नियंत्रण कोण ठेवणार?
हा संपूर्ण गोंधळ म्हणजे केवळ अपघाताची साखळी नाही. हा रचलेला एक मोठा कट आहे का, ज्यामध्ये देशाचे धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षा यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत नाहीत का? या साऱ्या पडद्यामागच्या खेळाडूंचा आणि त्यांचा गुप्त उद्देश समोर येईल का?
ट्रंप भेटीच्या वेळी दिल्लीत दंगे घडवले गेले होते.
पुतीन भेटीच्या वेळी - इंडिगो ने गोंधळ करवून कंपनीच्या स्वार्थासाठी संपूर्ण देशाचे लक्ष विचलित केले गेले आणि नियमांना वाकवले गेले. पण हा केवळ एक प्रयोग असेल तर? पुढच्या मोठ्या खेळीची ती केवळ एक रंगीत तालीम असेल का?
एक पॅटर्न तर सहज दिसतो आहे.
असे असेल तर पुढील टारगेट काय असेल असे तुम्हाला वाटते?
पुढील कोणत्या नेत्याच्या भेटीच्या वेळी आता काय घडू शकेल?