Log in or register to post comments611 views लक्ष लोलक तोलत उसळते निळी लाट किनाऱ्याशी फुटताना एक अतृप्ती उत्कट मावळतीच्या दिशेला फूल फुटे केशराचे निळ्या घुमटाला पडे कोडे कुण्या नक्षत्राचे तोल ढळण्या आधीच हस्तिदंती मनोऱ्याचा कोष आवळून घेतो मीच माझ्या भोवतीचा