हरवलेला संयम चिंताजनक
==============
- राजीव उपाध्ये
सध्याच्या काळात वैद्यकीय व्यवसाय कमालीचा जिकीरीचा बनला आहे. त्याची कारणे असंख्य आहेत-अत्यंत खर्चिक आणि दीर्घकाळ चालणारे, जीवघेण्या स्पर्धेने गढुळलेले उतरंडप्रधान वैद्यकीय शिक्षण, व्यवसाय चालू करण्यासाठी आणि स्थिर होण्यासाठी लागणारा वेळ नियामक आणि कायदे यांच्या कटकटी सांभाळताना होणारी कसरत, रुग्णांच्या अवाजवी अपेक्षा इ०
या पार्श्वभूमीवर युटूयुबवर बघण्यात आलेले पुढी्ल व्हीडिओ हिमनगाचे बाहेर आलेले एक टोक असावेत असे वाटते-
https://www.youtube.com/shorts/5a0s3th19-Y
https://www.youtube.com/shorts/eh5mQVPggmc
https://www.youtube.com/shorts/y7b9wge-Qwo
https://www.youtube.com/shorts/1HJHjTxepZY
https://www.youtube.com/shorts/QyIPfaukP_g
https://www.youtube.com/watch?v=-kV2fGUB-oU
वरील यादीत आणखी बरीच भर टाकता येईल.
खरं तर मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या वैद्यकीय व्यवसायिकांना सन्मानाने क्वारंटाईन का केले जात नाही?
मानसिक संतूलन हरवलेले वैद्यकीय व्यावसायिक जर अशा रितीने रूग्णाशी वर्तन करणार असतील, हे सर्व बघितल्यावर प्रश्न पडतो "मानसिक दृष्ट्या स्थिर" वैद्यकीय व्यावसायिक ओळखायचा कसा? तसेच अशा अस्थिर व्यावसायिकांकडून रूग्णाना योग्य उपचार मिळतील याची खात्री काय?
भारतीय आरोग्य व्यवस्थेचे भवितव्य मला तरी चिंताजनक वाटते...