ख फ वर एक मजेदार चर्चा वाचली. चर्चेची सुरवात अ बा नी सुरू मग गवि नी त्यात भर टाकली.
त्यातली गम्मत इथे कळावी आणि त्या गमतीत आणखी भर पडावी म्हणून हा धागा.
पुढचे शब्द गविं आहेत.
मित्रमंडळांची नावे हा रोचक विषय आहे. माझ्या कॉलेज जीवनात, म्हणजे तीसेक वर्षे मागे जा.. तेव्हा रक्तपात, युद्ध, संघर्ष याला खूप सन्मान होता.
संग्राम मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, क्रांती तरुण मंडळ, फायटर, तलवार, ...
एका ठिकाणी तर ब्लड ग्रुप असे नाव वाचले होते. रक्तगट नव्हे, मंडळ.
दुचाकी वाहने, विशेषत: बुलेट, हिच्यावर तर खूनखराबा किंवा टोळीयुद्ध हवेच.
माफिया असा इंग्रजी स्टिकर, कवटी चिन्ह, उगारलेला चाकू आणि त्यातून रक्ताच्या थेंबाची धार. एकमेकांना क्रॉस करणाऱ्या बंदुका वगैरे अशी प्रतीके.
हे सर्व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील निरीक्षण, पुण्यापर्यंत.
सांगलीहून कोल्हापूरला जायच्या रस्त्यावर अतिशय देवस्थान म्हणून पाटी बघितली होती.
मुंबईत चेंबूरला वाघोबा मित्रमंडळ म्हणून एक नवरात्रीचा मांडव बघितला होता ( चं सु कु)
“अचानक” मित्र मंडळ! अशी दोन मंडळे मी पाहिली, मित्रमंडळाचे नाव “ अचानक” का असावे? अचानक असे नाव असते? की अचानक ठरले मंडळ स्थापावे? म्हणून मंडळाचे नाव अचानक? :) ( अ बा.)
अ नगरला एक पाटी " अचानक तरुण मंडळ " अशी पाहिली होती.
तुम्ही पाहिली असलेली एखादी मजेशीर पाटी ( मित्र मंडळाचे नाव) सांगा.