बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात.
आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय?
१) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात.
२) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात.
३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत. उलट त्यातल्या बर्याचशा परंपरा आजच्या काळातही कशा उपयोगाच्या आहेत हे सांगतात.
४) ते हिंदू धर्म हा महान आहेच यावर शंभर टक्के श्रद्धा ठेवतात ते हिंदू धर्माचे तुलना अन्य धर्माची करत बसत नाहीत. हिंदू धर्मासाठी लढलेल्या ऐतिहासिक लोकांबद्दल यांना अभिमान असतो.
५) प्रत्येक हिंदूंने हिंदू धर्माबद्दल अतीव अभिमान बाळगावाच अशी त्यांची अपेक्षा असते.
६) अफगाणिस्तानपासून ते बांग्लादेशपर्यंत हा सर्व भाग एक हिंदूराष्ट्र बनावे ही त्यांची इच्छा असते. या हिंदुराष्ट्रात मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्माचे लोक असता कामा नयेत अशी त्यांची इच्छा असते. हिंदुराष्ट्रात केवळ हिंदू हा एकच धर्म असला पाहिजे अशी त्यांची इच्छा असते.
आता उजवे म्हणजे काय बघा.
१) यांना डेव्हलपमेंटमधे सर्वाधिक स्वारस्य असते. आर्थिक उन्नती , चांगले रस्ते , चांगल्या पगाराच्या पुरेशा नोकऱ्या , व्यवसायासाठी सुरक्षित वातावरण, दर्जेदार शिक्षणाच्या पुरेशा सुविधा या यांच्या मुख्य मागण्या/अपेक्षा असतात.
२) इस्लाममध्ये विज्ञानवादी विचारांना फारसा थारा नाही. तसेच बऱ्याचशा परंपरा या सातव्या शतकातल्या आहेत. शिवाय इस्लाम हाच एकमेव धर्म या जगात असता पाहिजे वगैरे विचारसरणी बहुतांश मुस्लिमांची आहे. त्यामुळे हा धर्म विकासासाठी फारसा अनुकूल नाही असे भारतातील उजव्यांचे ठाम मत असते. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशात इस्लामचे पालन करणारे कोणीही नको असे यांचे ठाम मत असते. यांच्या दृष्टीने भारतातली ख्रिश्चन हे भारतातल्या मुस्लिमांइतके त्रासदायक नसले तरीही या जगातले बलवान देश हे मुख्यत्वे ख्रिश्चन बहुसंख्याक लोकांचे आहेत. त्यामुळे भारतातल्या ख्रिश्चन धर्मियांचा वापर करून डेमोग्राफी बदलून भारताला या ख्रिश्चनबहुल देशांच्या मतानुसार वागायला भाग पाडण्यास या देशातले ख्रिश्चन मदत करू शकतात असाही संशय उजवे विचारांच्या लोकांना असतो. म्हणूनच ख्रिश्चन धर्मियांच्या धर्मप्रसाराला उजव्या विचारसरणीच्या लोकांचा विरोध असतो.
३) उजव्या विचारसरणीच्या लोकांना विकासाला प्राधान्य देणारा कोणताही पक्ष सत्तेत आला तरी खरंतर चालणार असतो. पण त्यातल्या त्यात भाजप हा विकासाला चालना देणारा या देशाचे हित पाहणारा त्यासोबतच हिंदूंचे हित पाहणारा पक्ष आहे असे यांचे मत असल्याने कोणत्यातरी पक्षाला मतदान करायचंच आहे तर आपल्या धर्माच्या बाजूने उभ्या राहणार्या पक्षाला मतदान का करू नये? असे यांना वाटते. अन्य पक्षांच्या तुलनेत भाजप यांना बरा पर्याय वाटत असतो. त्यामुळे ते भाजप समर्थक असू शकतात. यांना सर्वाधिक तिटकारा काँग्रेसचा असतो.
४) उजव्या विचारांचे लोक हे हिंदू धर्माचे देव मानणारे किंवा अन्य कोणत्यातरी धर्माचे दैवत मानणारे असतीलच असे नाही. उजव्या विचारांचे लोक हे निरीश्वरवादीसुद्धा असू शकतात. धर्माची चिकित्सा करणारे असू शकतात. भारत हा हिंदुत्ववादी झाला नाही तरी देखील तो एक विकसित देश , राहण्यालायक देश व्हायला हवा ही यांची मनापासून इच्छा असते. कारण अमेरिका कितीही प्रगतिशील देश असला तरी देखील भारताइतकं मोकळं वातावरण अमेरिकेत नाही. त्यामुळे भारतातलं मोकळं वातावरण , कुटुंबाला प्राधान्य या गोष्टींसोबतच विकासाला प्राधान्य देणारा देश असा आपला भारत व्हावा असे यांना वाटत असते.
या दोन टोकांच्या मध्ये 'टोकाचे हिंदुत्ववादी' , 'मध्यम हिंदुत्ववादी' , 'हिंदुत्ववादाची किनार असलेले उजव्या विचारसरणीचे' असे उपभेद देखील आहेत.