संमतीवय: १८ -> १६
============
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेच्या निमित्ताने लैंगिक संबंधाचे वय १८ वरून १६ करावे का याबद्दल मोठी चर्चा सध्या चालू आहे. या चर्चेत संरक्षण आणि स्वायत्तता हे दोन प्रमुख गहन मुद्दे आहेत.
२०१३ मध्ये भारतात संमतीचे वय १६ वरून १८ करण्यात आले होते. परत ते १६ वर आणावे यासाठी इंदिरा जयसिंग या या याचिकाकर्तीचे मत आहे.
सरकारची भूमिका अशी आहे की वय कमी केल्याने लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित गुन्हेगारी अधिक वाढेल. तसेच हे वय घटनात्मक तरतुदींशी सुसंगत आहे.
याचिकार्त्यांची भूमिका अशी की संमतीने ठेवलेल्या लैंगिक संबंधाना "गुन्हा" ठरवल्याने त्यांच्या स्वायत्ततेला धोका पोहोचतो. २०१७ नंतर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये १८० % वाढ झाली. बरेच गुन्हे मुलीच्या आईवडीलांनी मुलीच्या आंतरजातीय/धर्मीय प्रेमसंबंधाना तिच्या इच्छेविरुद्ध अद्दल घडविण्यासाठी दाखल केले आहेत.
माझी भूमिका - दोन्ही बाजू सारख्याच समर्थनीय आहेत. विवेकाचा विकास (विशेषत: समाजाचे नियम स्वीकारण्याची क्षमता निर्माण) होण्या अगोदर लैंगिक विकास होणे किंवा मनुष्यप्राणी प्रजोत्पादनक्षम होणे, यात मानवी उत्क्रांती मोठ्या प्रमाणात गंडली आहे असे वाटते. एकंदर धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी परिस्थिती आहे.
मेंदूमध्ये उपाग्रखण्डाचे लिंबिक सिस्टीमवर नियंत्रण निर्माण न होणे किंवा संप्रेरकांच्या प्रभावामुळे उपाग्रखण्ड निष्प्रभ होणे हे या समस्येचे जैविक पातळीवरील कारण आहे.
लैंगिक शिक्षण कितीही प्रभावी पद्धतीने दिले तरी निसर्ग त्याच्या नियमांनी पुढे जातो. लैंगिक उर्जेचा निचरा होणे हा त्यामुळे कळीचा मुद्दा ठरतो.
विषय संवेदनशील असल्याने संयमित प्रतिसादानाच उत्तरे दिली जातील.