जुलै ११, २००६ चे शेवटी दोषी कोण?

जुलै ११, २००६ केवळ 11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, या स्फोटांच्या मालिकेत 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. हा मुंबईच्या इतिहासातील काळा अध्याय ठरला होता. प्रेतांची रास रचली गेली, संदर्भ एबीपी माझा वृत्त

१९ वर्षे खटला चालवून ११/१२ आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष सोडले. एक निर्दोषला शिक्षा होऊ नये म्हणून १०० अपराधी सुटले तरी चालतील या भुमीकेतून सुटलेले सर्वार्थाने निर्दोष असतात का? आमच्या मेणबत्ती वाल्या पुरोगामींना ११/१२ आरोपींच्या मानवाधिकाराची त्यांची वर्षे कशी वाया गेली याची पडली असेल.

मुंबई 7/11 बॉम्बस्फोट : हे निर्दोष असतील, तर खरे गुन्हेगार कोण? ते कुठे आहेत आणि त्यांना शिक्षा कधी होणार? पीडित कुटुंबांचा संतप्त सवाल

"सरकारनं आमची चेष्टा चालवून, न्यायाचा खेळ मांडलाय का?", 7/11 साखळी बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबीयांचा आर्त सवाल

या प्रश्नांचे उत्तर कोण देणार? २००६ पासूनच्या बदललेल्या सर्वच सरकारांनी तपास यंत्रणा आणि सरकारी वकीलांचे जनतेच्या वतीने पैसे तर मोजले होते तसे न्यायाधिशांचे पगारही जनतेच्याच खिशातून गेले. जनतेला न्याय मिळाला का?

आम्हा सामान्य जनतेत तपास यंत्रणा आणि वकीलांच्या कामाचे ऑडीट करण्याची पात्रता नसते. पण तपास यंत्रणा वकील तसेच न्यायाधिशांच्याही कामाचे दुसर्‍या राज्यातील समकक्ष व्यक्तींकडून वेळीच ऑडीट आणि सुधारणा प्रक्रीया का उपलब्ध नसावी असा भाबडा प्रश्न पडला.

* हा एक सात्विकतेने संतप्त संवेदनशील धागा आहे, कृपया कोणत्याही बाजुने राजकीय रतीब घालु नये आणि पुरोगामी मेणबत्तीकारांनी या धाग्याला फाट्यावर मारून वेगळा धागा काढावा.

* अनुषंगिका व्यतरीक्त चर्चा आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्या साठी प्रतिसादांसाठी अनेक आभार.