ग्रोक४

ग्रोक४
===

बहुचर्चित ग्रोक४ चे नुकतेच अनावरण झाले. मी ग्रोक३ ची सशुल्क सेवा घेत असल्याने आणि मी त्याबाबत समाधानी असल्याने ग्रोक४ काय करणार याची उत्सूकता होतीच.

ग्रोक४ च्या लोकार्पणाचा समारंभ इथे बघायला मिळाला.
https://www.youtube.com/watch?v=MtYsUdfZPMA

या दृक्फितीमध्ये तंत्रसामर्थ्योद्धत महामंडलेश्वर इलॉनशास्त्री मस्क यांचे गर्वसूक्त ऐकून धक्का बसला. सुमारे दीडेक वर्षापूर्वी एका जपानी समूहाने लवकरच ए०आय० पीएचडी दर्जाचे काम करू शकेल असा दावा केला होता.

हा दावा अपेक्षेपेक्षा लवकरच प्रत्यक्षात उतरलेला दिसतो.

अजून मी ग्रोक४ ची ताकद अजमावली नाही, पण सध्याच्या त्रिभाषासूत्राने निर्माण झालेल्या वादळाविषयी मत विचारले तेव्हा त्याने फायदे आणि तोटे या दोन्ही बाजूंवर प्रकाश टाकला.

त्यात मला खालील मुद्दे जास्त गंभीर वाटले-
Potential for Confusion and Developmental Delays: Introducing three languages simultaneously can confuse young children, delaying mastery of their first language or causing issues like mixing vocabularies, pronunciation challenges, or grammar errors. This might extend to other areas, such as gross motor skills or speech problems like stuttering, potentially requiring therapy. In extreme cases, it could lead to limited vocabulary if languages are compartmentalized (e.g., assigned to specific days).

अर्थात असे नुकसान झालेच तर मा०मु० आणि देशाच्या एकात्मतेची चिंता वाहणारे राष्ट्रीय पुडी-सोडक संघटनेचे नेते याबाबत कसलीही जबाबदारी घेणार नाहीत, हे सांगायची गरज नाही.

जाता जाता - माझ्या लहानपणी अमृत आणि विचित्र विश्व अशी दोन रीडर्स डायजेस्ट्च्या धर्तीवर दोन मराठी डायजेस्ट निघत असत. त्यात एक विनोद वाचला होता.

एकदा चीनी श्रेष्ठ का जपानी श्रेष्ठ असा वाद एका राजाच्या पुढे निर्माण झाला होता. त्याने दोन्ही गटांना एका महालात ठेवले आणि एका आठवड्यात महालाच्या एका भिंतीवर आपली कला दाखवावी असा आदेश दिला.

चिनी गटाने आपली सर्व कल्पकता पणाला लावून त्यांच्या भिंतीवर सुंदर रंगीबेरंगी आणि नेत्रदीपक चित्रे काढली. जपानी लोकांनी मात्र त्यांना दिलेली भिंत रात्रंदिवस घासून गुळ्गुळीत आणि आरशासारखी चकचकीत केली. इतकी की त्यात चिनी लोकांनी त्यांच्या कल्पकतेने नटवलेल्या भिंतीचे प्रतिबिम्ब पडले...

राजाने कुणाला श्रेठत्व बहाल केले हे आता आठवत नाही, पण सांगायचा मुद्दा असा की आता ए० आय० आता पी०एच०डी० च्या दर्जा पर्यंत जर पोचला आहेच, तर मा०मु० आणि राष्ट्रीय पुडी-सोडक संघटनेने आता महाराष्ट्रातील पी०एच०डीचा दर्जा देशात कसा अव्वल होईल याची चिंता करणे जास्त उचीत ठरेल...