आषाढी एकादश,
भक्त कासावीस,
विठ्ठलाची आस,
दर्शनाची ||
उचंबले मन,
हरपले भान,
लागलेच ध्यान,
पांडुरंग ||
वैजयंती सुगंध
तुटे भाव बंध,
वैष्णव ते धुंद,
नाचण्यात ||
टाळ मृदुंग धून,
विठ्ठला चे गुण,
भजन आतून,
कीर्तनात ||
नाचे वारकरी,
तुळशी हार करी,
भवतारु पारकरी,
कृपावंता ||
कसा भक्तीरंग,
बाजीगर दंग,
पाहता अभंग,
लेखणीत ||