हा धागा आहे आपल्या सगळ्यांच्या काही न वापरल्या /सूप्त टॅलेंट्स बद्दल
आपण बहितेकजण जे शिकलो त्या आधारावर नोकरी व्यवसाय केले.
कॉलेजात असताना अनेक इच्छा असतात. उदा: नाटक करणे , टॉक शो करणे , लेखन करणे , संगीत वादन गायन , चित्रे काढणे , अनवट ठिकाणे शोधून भटकंती करणे., इतिहास अभासणे , जिओ पोलीटीकल माहिती घेणे, विवीध खाद्य पदार्थ करणे ( शेफ होणे ), सुंदर बाग करणे , कुत्रे पाळणे , मासे पाळणे, ई.
हे सगळी स्वप्ने आपण हौस / हॉबी या सदरात टाकून त्या सगळ्या गोष्टी नाकारून अभ्यासावर लक्ष्य देत नोकरी व्यवसाय केले.
एक वाक्य आठवते कुछने सपनो के लिये अपनो को खोय... तो कुछने अपनो के लिये सपनों को खोया.
माझ्या पिढी तले बहुतेक जण दुसर्या गटातलेच. स्वतःवर अन्याय करुन घेणारे. स्वतःकडे असताना क्षमता ही, ते दरवाजे बंद करून स्वतःपासूनच होरावून घेणारे.
त्यावेळच्या पालकांची / समाजाची मानसीकता असेल किंवा कसे. पण ते घडले.
माझ्या वर्गात एक जण खूप छान स्पिन बॉलिंग करायचा इतका की तो किमान रणजी तरी सहज खेळू शकला असता. पण......
पण काही भाग्यवान असेही होते की त्याना त्यांची स्वप्ने खरी करता आली. माझ्या वर्गातील एकाला शेती मधे खूप रस होता. पुण्यातील नामवंत कॉलेजमधून एम बी ए करूनही पठ्ठ्याने नोकरीच्या नादाला न लागता शेती संभाळली. नुसती संभाळलीनव्हे तर व्यावसयीकरीत्या फायद्यात आणली.
ही यादी तयार करत असताना जाणवले की आज यू ट्यूबवर असे करणारे अनेक तरुण तरुणी दिसतात. व्ही लॉगर्स. शेफ , पत्रकार , विवीध विषयांवर पॉडकास्ट करणारे , संगीत शिकवणारे, स्वतःचे स्टूडीओ असणारे , स्वतःचे यू ट्यूब चॅनल असणारे, मालीका बनवणारे असे अनेक आपल्या आवडत्या हौसेचाच व्यवसायात उपयोग करणारे.
हेवा वाटतो.
जसे वर म्हंटले आहे त्याप्रमाणे तुमच्यात एखादा गुण होता मात्र त्याला परिस्थितीमुळे न्याय देता आला नाही याची आज खंत वाटते.
आपल्याला करायचे होते पण त्याकडे दुर्लक्ष्य करून आपल्याला पोटामागे धावावे लागले. अशा गोष्टींची यादी करुया.
मला नाटकात काम करायची फार आवड होती. काही स्पर्धांत बक्षीसेही मिळाली होती. त्या आवडीला फार प्रयासाने मुरड घातली. आज त्याबद्दल वाईट वाटते.
हार्मोनीयम / की बोर्ड उत्तम वाजवायचो. बासरीही वाजवायचो. पण आज ते सगळे काधीतरी सठीसामासी घडते. कॉलेजात असताना त्याकडे लक्ष्य दिले असते तर आज कदाचित काहितरी नावलौकीक असणारा कलावंत झालो असतो. त्याबद्दल खंत वाटते.
मराठी / इंग्रजी भाषेतील वाचन भरपूर करायचो. भाषेचा अभ्यास करायचे राहून गेले.
यादी करुया स्वत:ला जे काही द्यायचे होते आणि ते राहून गेले.( नक्षत्रांचे देणे )