चा-वट पॉर्निमा!

तिचे बोलणे खरे करते
ती असे नखरे करते

पिझ्झा बर्गर नेहेमीचे पण
जेवण सुद्धा बरे करते

राग नक्की झूठ असावा
प्रेम बहुदा खरे करते

मिठी मध्ये घेते आणिक
हट्ट सारे पुरे करते