राष्ट्रीय गांभीर्याचे प्रश्न
कोणत्याही चांगल्या उपायांचा सर्वात मोठा शत्रू म्ह० राजकारण! त्यामुळे अनेक प्रश्न रेंगाळतात आणि उपाययोजना केराच्या टोपलीत जातात.
राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांवर जसा सर्वपक्षीय पाठींबा गृहित धरला जातो, त्याप्रमाणे राष्ट्रीय गांभीर्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय सहभाग आणि सहमती आवश्यक आहे. याचा मोठा फायदा त्या प्रश्नांचे केले जाणारे राजकारण थांबविण्यात होईल.
महनगरांच्या वाढीचे प्रश्न हे राष्ट्रीय गांभीर्याचे प्रश्न मानले गेले, आणि ते अशा सर्वपक्षीय सहमती परिषदेकडून सोडवले गेले तर अनेक चांगल्या सूचनांचा चुत्थडा होणे थांबेल. अशा परिषदे पुढे आलेल्या प्रश्नांचे राजकारण केले जाणार नाही, अशी हमी परिषदेतील सदस्यांकडून घेता येईल. केल्यास त्या पक्षाला मोठा दंड करायचा. तसेच सूचवलेल्या उपायांचे श्रेय त्या त्या पक्षाला देणे केव्हाही चांगलेच...
आपल्या देशात अनेक आर्कीटेक्चर महाविद्यालये आणि डीझाई्नस्कूल्स मध्ये असे प्रश्न कल्पकतेने सॊडविण्याचे पद्धतशीर शिक्षण दिले जाते. बथ्थड डोक्याचे राजकारणी त्यांचे ऐकत नाहीत, कारण त्यांची बुद्धी अतिशय छोटी असते आणि नवे स्वीकारायची क्षमता नसते. बाहेरच्या देशात अशा त्रयस्थ अभ्यासगटांच्या शिफारशी गांभीर्याने घेतल्या जातात.
मुंबईत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी सोपी नाही. पण मुंबईतीवर ताण आणणार्या उद्योगांची वाढ थांबवणे शक्य आहे, त्यासाठी सर्वपक्षीय सहमती-परिषद महत्त्वाची भूमिका बजावू शकते.