न्यायाधीश 'कॅश'वंत वर्मा...

घ्या कविता...

'कॅश'वंत वर्मा,
भोग आता कर्मा,
महाभियोगधर्मा
सामोरी जा ||

जर दिला राजीनामा,
तर नाही काजीनामा,
सांग तुझा कारनामा,
निवृत्ती जा ||

न्यायाधीशाच्या घरी रोकड,
आता तो शोधतो बोकड,
जो घेईल खांद्यावर जोखड,
वाचवण्या ||

संसदेत घेराव,
मांडला ठराव,
तरी हे राव,
ढिम्म नाही ||

न्यायाधीश यशवंत
पकडला गेला 'कॅश'वंत
आता करणार बस वंत
घरातच ||