सोने एक लाखावर...

काल २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याने एक लाख रुपयांचा टप्पा गाठला. जून २०२४ मध्ये सोने सत्तर हजार होते, तेंव्हा, वर्षभरात सोने एक लाखाचा टप्पा ओलांडेल असे अंदाज मी वर्तवला होता. सोने आता एक लाखावर गेले आहे. अर्थात आज ते थोडेसे उतरले आहे.

सोन्याच्या किमतींबाबतीतील काही वैयक्तिक, सार्वजनिक टप्पे सांगतो -

  • १९६४ साली सोने साठ रुपये तोळा होते.
  • १९७७ साली सोने ५०० च्या घरात होते.
  • २००५ साली (माझे लग्न झाले तेंव्हा) सोने ६००० होते.
  • २००७ साली पहिल्यांदा सोन्याने पाच आकडी किंमत गाठली होती.
  • आता सोन्याने सहा आकडी किंमत गाठली आहे.
  • सोन्याला सात आकडी किमंत गाठायला किती वर्षे लागतील?

गुंतवणुकीचे अनेक पर्याय असतात - जमीन, इमारती, सोने, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, बँकांतील ठेवी, इत्यादी. त्यांपैकी सोने ही एक मृत गुंतवणूक आहे असे काही लोक म्हणतात. त्यांचे मत त्यांच्यापाशी; सोने हे काही केवळ गुंतवणुकीपुरतेच मर्यादित नाही.

कल्पना करा तुमच्याकडे दोन पर्याय आहेत -

  1. लाख-दीड लाखांचा फोन कानाला लावून एकजण बोलत आहे.
  2. बोटांत दोन अंगठ्या व वीसेक हजारांचा फोन कानाला लावून दुसरा एकजण बोलत आहे.

तुम्ही कोणता पर्याय निवडाल?

- (सोनंप्रेमी) द्येस्मुक् राव्