सतारीचे बोल

जरा सोडला लगाम ढिला,
अंग प्रत्यंगाने संकेत दिला.

हळूहळू कुरकूर करू लागलं.
गोबरे झाले गाल,टम्मं पोट फुगलं.

हात पायाच्या झाल्या काड्या,
कांट्यांनी चढल्या नव्वद माड्या.

कधी नव्हे तो पिंगळा साद देत होता.
दिवसा घोरासुर कुस्ती खेळत होता.

कधी माझ्या भोवती जग फिरले,
तर कधी डोळ्यासमोर तारे विरले.

भर दुपारी जगाला भोवळ आली.
आणी बोळवण धन्वंतरींच्या घरी झाली.

काही रक्तपिपासू रक्त शोषू लागले,
तर प्रकांड पंडीत कारण शोधू लागले.

हृदयाची सतार बिघडली होती
दिड दा दिड दा लय बेकाबू होती

गवसणीतूनच तारा छेडल्या
सतारीच्या खुंट्या पिळल्या

सतार झाली म्हातारी...
तारा नाजूक झाल्यात.

तार सप्तक लावू नका.
आर्त स्वरात गावू नका.

धन्वंतरीने दिला सल्ला.

ठिक झाली,ठिक झाली....
शुभेच्छुकांचा एकच कल्ला.

नुकतीच एन्जिओप्लास्टी झाली. तीन ब्लाॅक आहेत पैकी एक शंभर टक्के ठिक झाला. दोन मेडिसीन ने विरघळतात ते एक महिना बघणार व नंतर पुढचा निर्णय घेतील.

तब्येत सुधारत आहे. सकाळचे वाॅक सुरू झाले आहे. तसा काही त्रास नाही सध्यातरी. शुभेच्छकांच्या शुभेच्छांनी खुप मनोबल वाढवले.

हर फिक्र को...धुऐंमे मत ऊडाओ.