Log in or register to post comments528 views शब्दांचा दंश जिव्हारी- होता मी विमुक्त झालो माथ्यावर सूर्य तरीही काजव्यासवे झगमगलो शब्दांची अविरत गाज भवताल भारूनी उरली नादावर अनुनादाची हलकेच लहर शिरशिरली शब्दांचा अबलख वारू चौखूर उधळुनी गेला अर्थाचा लगाम लहरी हातून कधीचा सुटला