डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.
भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही?
ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते.
"अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो
ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली.
मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली.
https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-don…
भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे?
प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे?
ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.