ताज्या घडामोडी - जानेवारी २०२५

संतोष देशमुख हत्या प्रकरण या धाग्यावर "अशा चर्चा होणे गरजेचे आहे" असे मुक्त विहारि यांनी म्हटले, म्हणून हा धागा.

आ़जची ठ्ळक घडामोडः
अमेरिकेत दहशतवादी हल्ला, आधी ट्रकने चिरडले अन् नंतर हल्लेखोराने सुरू केला गोळीबार; १५ लोकांचा मृत्यू
https://www.loksatta.com/desh-videsh/us-new-orleans-truck-attack-10-kil…

लोकसत्ता ने हल्लेखोराचे नाव दिलेले नसले, तरी ते "शमसुद्दिन जब्बार" असे असून त्याने अमेरिकन सैन्यात सेवा केल्याचे कळते. त्याच्या वाहनात आय्सिस (ISIS) चा ध्वज आढळल्याच्या देखील वार्ता आहेत. अमेरिके करता नववर्षाचि सुरुवातच दहशतवादी आक्रमणाने झाली आहे.

या घटनेत बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली! दहशतवादाला कोणताही धर्म नसतो याचा आपण उद् घोष करु या.