रविवारी सकाळी वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्रमांक १ वर झालेल्या चेंगराचेंगरीला रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप रेल यात्री परिषदेने केला आहे.
दिवाळी आणि छटपूजेनिमित्त उत्तर प्रदेश, बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढत आहे. वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी पश्चिम रेल्वेने अतिरिक्त गाड्या सोडल्या असल्या तरी गोरखपूरला जाणारी एक ट्रेन रद्द झाल्यानंतर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून उपाययोजना न केल्याने व वाढलेल्या गर्दीला नियंत्रित न करता आल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप परिषदेने केला आहे.
वांद्रे टर्मिनसवरून रविवारी सकाळी ५.१५ मिनिटांनी साप्ताहिक अंत्योदय एक्सप्रेस सुटणार होती. गोरखपूरला
जाणारी ट्रेन पकडण्यासाठी रात्रीपासूनच वांद्रे टर्मिनसवर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. महत्त्वाचे म्हणजे अंत्योदय एक्स्पेसच्या आधी सणासुदीच्या निमित्ताने सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त ट्रेनपैकी एक ट्रेन सुटणार होती. मात्र, त्या ट्रेनला १६ तास विलंब झाल्याने ती ट्रेन रद्द करण्यात आली.
आता जी घटना घडली ती गंभीर आहे. गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजेत. ठाण्यात तलावपाड्याला छटपुजेला जी गर्दी होते ती आता वाढत चालली आहे. एवढी वर्षे झाली पण अजूनही मुंबईला येणारी भैय्यांची गर्दी कमी झाली नाही, उलट ती वाढतेच आहे दिवसेंदिवस. मग कुठेतरी डोंगराच्या पायथ्याला, दगडांच्या खाणीमध्ये, खाडीच्या पाणथळ जमिनीवर हे लोक अतिक्रमण करून पत्र्याच्या खोल्या बांधतात. सण उत्सवाला तुडुंब गर्दी होते. करोना काळात अशीच गर्दी झाली. हजारो जगतात हजारो जायबंदी होतात. उपाययोजना जशाच तशा. छटपुजा-दीपावली शुभेच्छा.