माझ्या संग चांदणं ही...

“माझ्या संग चांदणं ही”
हे माझं नवं गाणं रिलीज झालं आहे. एकदा नक्की बघा आणि गाणं कसं वाटलं सांगा.

https://youtu.be/wFyTCuCXdPs?si=u2k7pzivz-u5yW9i

सपनानं तुझ्या मन रातभर व्यापलं
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं
कंकण आवाज
पैजणाचं नाद
रातभर घुमे
सखे तुझी साद
असं कसं राती मला आगळच वाटलं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.

नभातला चांद सखे तुझ्यावानी वाटला
तुझा श्वास गंध साऱ्या रानीवनी दाटला
दाटला सुगंध
वाऱ्यातून येई
गंधाळून मन
सखे माझं जाई
गंध तुझ्या पिरतिचं रातभर दाटलं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.

सरुनिया रात मग उजाडता दिस
फुलापरी मन माझं उमलतं कसं
विखरून मनभर
सपनाचं ठसं
पिरतनं तुझ्या मन
भारलय जसं
असं कसं मन आता वागतय आगळं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.

दीपक पवार.