टणटणीची फुले..

... लहानपणी या फुलांचा आम्ही बराच वापर करत असू. त्याच्या हिरव्या टणक बियांचा वापर वर्गात मित्रांना मारण्यासाठी होत असे, तर त्याची टोके चोखून त्यातील साखर खाण्याची मजा वेगळीच असे. तसेच त्या बिया काळ्या झाल्यावर गोड लागत ते वेगळेच. अर्थात आपण सगळ्यांनी हा अनुभव घेतलाच असेल..

टणटणीची फुले !

बरेच दिवस त्या फुलांची छायाचित्रे काढायचे मनात होते. काल गाडीने परत येताना रेसकोर्सच्या मागे ही फुले दिसली. त्यांचे रंग पाहताना मला राजस्थानी रंगीबेरंगी कपड्यांची आठवण झाली. लहानपणी शाळेत शिकलेल्या विवीध रंगसंगती आठवल्या. काही फुले घरी आणली आणि त्याचे फोटो काढले. ते खाली टाकत आहे...

- जयंत कुलकर्णी.

image host

image host

image host

image host

image host

image host