Log in or register to post comments930 views निवडुंग वनांतरी फुलला पाहील मग कुणी कशाला धगधगली बघ शेकोटी धुरकट मग धुनी कशाला फड तुऱ्यावरी बघ आला गोफण मग जुनी कशाला मी याचक नच, तरी देसी राहीन मग ऋणी कशाला क्षण अगणित संभाव्यांचा शंका मग मनी कशाला पट नीटस स्थळकाळाचा त्यावर मग चुणी कशाला