
ऑलिम्पिक लोगो
२६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ खेळांचा कुंभमेळा पॅरिस, फ्रान्स मधे सुरू आहे. ऑलिम्पिकच्या इतीहासात फ्रान्सला खेळांचे आयोजन करण्याचा तिसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे.
अधुनिक जगाच्या इतीहासात ६ एप्रिल ते १५ एप्रिल १८९६ मधे अथेन्स, ग्रीस देशात पहिल्यांदाच हे खेळ भरवण्यात आले होते. १४ देशाच्या एकूण २४१ खेळाडूंनी भाग घेतला होता,सर्व पुरूष खेळाडू होते.सर्व मिळून ४३ इव्हेंट ९ प्रकारच्या खेळातील १० वेगवेगळे प्रकार आयोजीत केले होते,टेनिस,स्विमिंग,शूटिंग,ॲथेलेटिक्स, कुस्ती,जिम्नॅस्टिक्स, भार्रत्तोलन तलवारबाजी व सायकलिंग.
किंग जाॅर्ज एक ,ग्रीस ने पहिल्या खेळांचे ग्रीक भाषेत खालील शब्द उच्चारत सोहळ्याचे उद्घाटन केले.
"I declare the opening of the first international Olympic Games in Athens. Long live the nation. Long live the Greek people."
जवळपास ८०,००० प्रेक्षकांनी पहीला सोहळा बघीतला तर Mr. Demetrius Vikelas,पहिले जागतिक ऑलिम्पिक कमीटीचे अध्यक्ष म्हणून पहिल्या गेम ऑफ ऑलिम्पियाड चे यशस्वी पणे आयोजन केले. एकुण १२२ पदक मिळवण्यासाठी २४३ खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले.
===
स्टेडीयम १८९६

SR Nation------------------------G----S-----B----T
1 United States (USA)-----११-----७----२----२०
2 Greece (GRE)---------------१०---१८---१९---४७
3 Germany (GER)------------६------५-----२---१३
4 France (FRA)-----------------४------२---११---१३
5 Great Britain (GBR)--------२------३-----२----७
6 Hungary(HUN)---------------२-----१-----३-----६
7 Austria (AUT)------------------२-----१-----२-----५
8 Australia (AUS)----------------२-----०-----०-----२
9 Denmark (DEN)---------------१-----२-----३-----६
10 Switzerland (SUI)-------------१-----२-----०-----३
11 Mixed team (ZZX)-------------१-----०-----१-----२
12 Total------------------------------४३----४३---३६--१२२
या वर्षी २०६ देश आपल्या १०७१४ खेळाडूंवर बरोबर ३२ खेळां मधील ३२९ प्रकारच्या विविध स्पर्धेत भाग घेत आहेत. भारताने सुद्धा आपले ११७ खेळाडू उतारले आहेत. आपले सर्व खेळाडू अंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च स्थानी आहेत. यांच्या वर अभिमान तर आहेच व देशाला पदक तालिकेत जास्तीतजास्त वर नेण्यासाठी ते आपले कौश्ल्य पणाला लावतील यात शन्का नाही.देशाच्या शुभेच्छाआहेतच. सन १९०० पासून भारताने २४ ऑलिम्पिक खेळांमध्ये एकूण ३६ ऑलिपम्पिक पदके जिंकली आहेत.
२०२० टोकिओ ऑलम्पिक्स मधे पदकांचे मानकरी
Mirabai Chanu Silver Women's 49kg weightlifting
Lovlina Borgohain Bronze Women's welterweight boxing
PV Sindhu Bronze Women's singles badminton
Ravi Kumar Dahiya Silver Men's 57kg wrestling
Indian hockey team Bronze Men's hockey
Bajrang Punia Bronze Men's 65kg wrestling
Neeraj Chopra Gold Men's javelin throw
मनू भाकरने ,१० मिटर एअर पिस्तूल या खेळात कांस्य पदक मिळवून भारताचे खाते उघडले आहे. आतापर्यंत मी पाहीलेल्या खेळातील पि व्ही सिंधू,शिला आकुला, मोनिका बात्रा,रेड्डी,शेट्टी,बलराज पनवर यां व्यक्तिगत स्पर्धेत तर हॉकी मधे विवेक व त्याच्या सह खेळाडूंनी आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
खेळ बघताना दिवस कसा जात आहे कळतच नाही. खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत आहेत तर मी सदैव त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे.
मी पाहीलेले काही सुवर्ण क्षण....
मेरा भरत महन्,जयहिन्द्.