तुमची निष्ठा कुठे ?

आज संसदेत काही नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यात निदर्शनास आलेली काही वाक्ये :

ओवेसी - जय भिम. जय मीम. जय तेलंगाना . जय फलस्तीन . अल्लाहु अकबर.

राहुल गांधी - जय हिंद. जय संविधान

छत्रपालसिंग गंगवार - जय हिंदुराष्ट्र. जय भारत.

(हे म्हणल्यावर लगेच विरोधी पक्षाच्या बाजुने - "ये संविधान विरोधी है" अशा अर्थाच्या घोषणा ऐकु आल्या. मात्र पॅलेस्टाईनच्या जयजयकारानंतर विरोधी पक्ष पैकी "ये संविधान विरोधी है" असे कोणी म्हणल्याचा व्हिडीओ दिसला नाही. )

निलेश लंके - जय हिंद. जय महाराष्ट्र. राम कृष्ण हरी

वरपक्षी हे सर्व लोकं वेगवेगळ्या विचारधारांचे नेतृत्व करतात असं दिसत असलं तरीही मुळात इथे दोनच विचारधारा आहेत हे सर्व कळत्या जाणत्या सुज्ञ लोकांना व्यवस्थित लक्षात येईल !

बस्स, आता प्रश्न इतकाच आहे की - तुमची निष्ठा कोठे ?