Log in or register to post comments2233 views जटिलाच्या दारावरती दुर्बोध देतसे थाप भेटीत उमजले दोघा, "उभयतांस एकच शाप सद्दीत सुमारांच्या ह्या उ:शाप नसे शापाला अस्वस्थ उद्याची हाक ऐकू ना येई कुणाला" दुर्बोध जटिलसे हसले दुर्बोधून जटिलही गेले अन् विषण्ण होऊनी दोघे आश्रयी कवीच्या गेले :)