टूलकिट्स : २०२४ ते २०२९

प्रस्तावना : तुर्तास आम्ही आमच्या हिमालयातील भटकंतीवर सविस्तर, प्रांजळ आणि कोणत्याही प्रकारे राजकारण विरहीत अशी लेखमालिका लिहिण्यात व्यग्र होतो मात्र तिथेही काही लोकांनी येऊन प्रतिसादात स्कोअर सेटलिंग करायला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने डोक्यात चमकुन गेली.
मी ज्या आश्रमात रहात होतो तेथुन जवळच्याच एका पुरातन मंदिरात खुद्द स्वामी विवेकानंद ह्यांनी त्यांच्या साधना काळात येऊन तपश्चर्या साधना केलेली होती . त्यांचे एक वाक्य आठवले :

" ह्या जगाची समस्या ही "दुर्जनांची सक्रियता " नसुन "सज्जनांची निष्क्रियता" ही आहे."

मग डोक्यात ट्युब पेटली, तुम्ही असे हिमालयात निघुन जाऊन सामाजिक गोष्टींबाबत हात झटकु शकत नाही. आपले समर्थ रामदास स्वामी म्हणाले तसे :

"मुख्य ते हरिकथा निरुपण | दुसरे ते राजकारण | तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || श्रीराम ||"

किंव्वा आपले लोकमान्य टिळक गीतारहस्यामध्ये म्हणाले तसे -

"मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः।सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते।।१८.२६।।"

राजकारण हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आपण त्याच्याकडे पाठ फिरवुन, दुर्जनांना रान मोकळे सोडुन, हिमालयात निघुन जाऊ शकत नाही . आपण धैर्य आणि उत्साहाने आपलं कर्म करत रहायचं आहे !

https://youtu.be/mWkvSO2Gfdo?t=2487

तस्मात परत एकदा राजकारणाकडे येऊन अन्यत्र प्रकाशित अशी आमची राजकीय टूलकिट्स इथे पुनःप्रकाशित करीत आहे !

______________________________________________________________________________________

इंडि टूलकिट :

१. सर्वप्रथम ई.व्ही.एम च्या नावाने रडायला सुरुवात करायची.
२. त्यानंतर भाजपा ने बहुमत चुराया है असे म्हणायचं अन रडत रडत आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे असे म्हणायचं
३. त्यानंतर एक फॉरेन / नेपाळ ट्रिप ( यु नो व्हॉट आय मीन ;) )
४. मग देशविघातक कारवाया करणार्‍यांन्ना उद्युक्त करायचं . भारत तेरे तुकडे होंगे ... इन्शा ... वगैरे म्हणणार्‍यांना समर्थन द्यायचे.
५. मग हिवाळा आला की दिल्लीच्या सीमेवर कोणते तरी कारण काढुन आंदोलन करायचे, अन दिल्लीचे रस्ते जाम करायचे.
६. मग कोणत्या ना कोणत्या राज्यात, तिथल्या तथाकथित उच्चवर्णीय गटातील प्रत्यक्षात मागास लोकांना आरक्षणाचे गाजर दाखवुन आंदोलन उभारायचे.
७. अधुन मधुन काहीतरी नॉन-इश्यु काढुन उगाळत बसायचे. म्हणजे कसे की गल्ली बोळात चिंधी चोरी झाली तरी त्याला मोदी कसे जबाबदार अशी चर्चा सत्रे चालवत रहायची.
८. मग विदेशात जाऊन तिथल्या युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन भारताविरुध्द गरळ ओकायची अन लोकशाही पध्दतीने सरकार निवडुन आणाणारे बहुतांश भारतीय कसे मुर्ख आणि फॅसिस्ट आहे अन आपणच कसे शहाणे आहोत ह्यावर प्रवचने देत रहायचे.
९. बाकी जिथे मिळेल तिथे - साहित्य संम्मेलने , कला , आर्ट फिल्मफेस्टिवल वगैरे मध्ये , शाळा कॉलेजेस मध्ये वादंग निर्माण करत रहायचे.
१०. आणि सर्वात महत्वाचे ह्यातील काहीच नसेल तेव्हा - आर.एस.एस. , मनुवाद , ब्राह्मणवाद , हिंदु दहशतवाद , काही मंदिरे , संप्रदाय त्यांच्या परंपरा , ह्यांवर सतत टीकेची झोड ऊडवत रहायचे.
थोडक्यात काय तर बामणी मनुवादी वेदांमधील उपनिषदात जे म्हणले आहे - ॐ शांति: शांति: शांति: , ती शांतता कदापि ह्या देशात नांदली नाही पाहिजे.
संघर्ष करा , संघर्षच करत राव्हा :)

______________________________________________________________________________________

भाजप टूलकिट :

१. सर्वप्रथम , जगातील सर्वात मोठ्ठी लोकशाही असलेल्या , तब्बल ९७ कोटी मतदाते असलेल्या भारतात व्यवस्थित इलेक्शन निवडणुका घडवुन आणल्याबद्दल निवडणुक आयोगाचे अभिनंदन करायचे अन लोकसभा निवडणुकीतील लाटेवर स्वार होत महाराष्ट्रात निवडणुका लावायच्या.
२. समान नागरी कायदा लाऊन धरायचा . त्याला कोण कोण विरोध करत आहे हे व्यवस्थित हेरुन घ्यायचे मग त्या पक्षातील लोकांच्या मागे सीबीआय लावायची. कारण समान नागरी कायद्याला विरोध करणारे कोणत्याना कोणत्या प्रकारे गुन्हात सामील असणारच , त्यांच्या मागे एकदा हात धुवुन लागले की झक मारत त्यांचा विरोध गळुन पडतोय अन पळता भुंई थोडी होतंय.
३. जबरदस्त लोकांच्या स्वप्नात असलेले धोरणात्मक आर्थिक निर्णय घ्यायचे . त्याला कोण विरोध करतंय बघायचं , मग त्यांच्या मागे ई.डी लावायची . काँग्रेसच्या निर्नायकी डिसिजन पॅरालिसिस ने मरगळलेल्या सिस्टीमचा फायदा घेऊन हे लोकं नक्कीच मलिदा छापुन बसलेले आहेत, त्यांना दे माय धरणी ठाय करुन सोडले की त्यांच्या विरोध गळुन पडतो अन खरे महत्वाचे निर्णय घेता येतात.
४ . त्यांनंतर राज्याराज्यातील निवडणुकांकडे वळायचे, कारण येन केन प्रकारेण देश काँग्रेसमुक्त झाला पाहिजे, मग भले सगळे "आदर्श" काँग्रेसी सामावुन घ्यायला लागले आपल्या पक्षात तरी बेहत्तर. काँग्रेस ही विचारधारा आहे ती संपली पाहिजे. गोळीने गांधी मारता येतो , गांधीवाद नाही हे नथ्याला कळलं नाही ते आता आता कळुन चुकलं आहे. मनातला गांधीवाद मेलेली ही माणसं बदलली तर वाल्याकोळ्याचा वाल्मिकी करुन घ्यायला कोणाची हरकत नाही. आणि मग त्यांना हाताशी धरुन राज्या राज्यात राज्यपालांतर्फे सुत्रे हलवुन अन बेरजेची गणिते करुन विरोधी पक्ष संपवायचे.
५. ह्या सर्वातुन महत्वाचे म्हणजे गेले १००० वर्षच्या गुलामगिरीचे जे व्रण ह्या देशाच्या भुमीवर आहेत ते पुसुन काढायचे . अयोध्या झाले , अजुन काशी विश्वनाथ आहे, मथुरा आहे , बिंदु माधव मंदिर आहे , मार्तंड सुर्य मंदीर आहे , भोजशाला सरस्वती मंदीर आहे , इन्द्रनारायण स्वामी मंदिर आहे ! खुप काम करायचं आहे !
६. येवढं सगळं करत असताना पाकिस्तान काहीतरी खुस्पट काढणारच , अन मुर्ख विरोधक देशाच्या बाजुने न बोलता , प्रो-पाकिस्तान बाजु घेणार . जशी त्यांनी २६-११ च्या वेळेस घेतली होती, पुलवामाच्या वेळेस घेतली होती, उरी च्या सर्जिकल स्ट्राईक बाबत घेतली होती. विरोधकांनी असा परफेक्ट फुलटॉस टाकला की न चुकता त्यावर सिक्सर्‍ मारायचा अन ते कशे देश विघातक आहेत हे लोकांना दाखवुन द्यायचं !
७. आणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे २०४७ चं आपलं संपुर्ण विकसीत भारताचे स्वप्न आहे . त्यालाही ही काँग्रेसी यडी गाबडी विरोध करतीलच =))))
पण आपण आपल्या ध्येयाप्रत अखंड चालत रहायचं . जसे चाणक्य-चंद्रगुप्त ह्या जोडगोळीने विस्कळीत भारत जगातील सुपर पॉवर बनवला होता , तसे आत्ताच्या काळात आर.एस.एस. - भाजपा ही जोडगोळी आहे असे समजुन अखंड प्रयत्न करत रहायचे ! चरैवति चरैवति !
साम दाम दंड भेद !
जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन , सोबत येणार नाहीत त्यांच्या शिवाय , अन विरोध करील त्यांचा विरोध मोडुन आपल्याला पुढे जायचं आहे .
एकच लक्षात ठेवायचं आता : गरीब मुळमुळीत भागुबाई अन आगतिक अन सिक्युलर इंडियाचे दिवस संपले. आता एकच लक्ष

२०४७ : विकसीत भारत