सीवूड येथील तलावात भरपूर फ्लेमिंगो पक्षी आल्याचे कळले होते. सकाळची कामे आटोपून साधारण दहाच्या सुमारास तलावास भेट दिली .
पाम बीच रस्त्यालगतच हा तलाव आहे.
पोहचता क्षणीच फेरी काही फुकट जाणारनाही याची जाणीव झाली. तलावात पुष्कळ पक्षी दिसत होते. तलावाच्या भोवती पायी फेरी मारण्यासाठी चांगला रस्ता केलेला आहे. फेरी मारता मारता टिपलेले पक्षांचे, तलावाचे व सभोवतालच्या इमारतींचे काही फोटो.
चालतांना नेहमीच्या किंवा क्वचित दिसणाऱ्या नाना प्रकारच्या वनस्पती नजरेस पडतात.
जशी ही चिंच. मस्त मोहरली आहे. हिच्या फुलोऱ्याची आंबूस चवीची भाजी लहानपणी खाल्ली आहे.
ही विलायती चिंच
ही जखम जोडी
ही जलपर्णी
हिचे नाव माहित नाही. शाळेत असतांना वहीची फाटलेली पाने चिकटवण्यासाठी शेंगांचा रस डिंकासारखा वापरायचो.
बऱ्याच झाडांच्या उंच शेंड्यावर कावळ्याची घरटे दिसली.
जपानमधील अकिरा मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने जंगल निर्मितीची नवीन पद्धत शोधली.
सर्वसाधारणपणे एक हजार चौरस फूट जागेत २५० मोठे, उंच, मध्यम आणि लहान अशा चार प्रकारच्या ४० पेक्षाही जास्त देशी पण दुर्मीळ वृक्षांची योग्य अंतरावर लागवड केली जाते, ज्यामध्ये कोणत्याही वृक्ष गटांचे वर्चस्व आढळत नाही. सर्व आपआपसात स्पर्धा न करता समान पातळीवर वाढताना आढळतात. (जालावरून साभार)
अशा जंगलांमुळे धूळ व ध्वनी प्रदूषण रोखण्यास मदत होते.
सकाळचे अकरा वाजत आले होते. मॉर्निग वॉक वाले आणि कामावर जाणारे बहुतेक जण घरी परतले असल्याने शुकशुकाटच होता. मुंगूस, सरडे, कोकीळ दिसले पण फोटो घेण्याआधीच अदृष्य होत होते. एक मनीमाऊ मात्र ऐटीत रस्त्यावरून चालत होती.
दोन श्वान चाफ्याखालच्या गारव्यात मस्त झोपले होते.
मैदानी खेळ, लहानांसाठी घसरगुंडी वगैरेसाठी जागा आहे.
स्थानिक लोकांच्या तलावातील होड्या
रस्त्याच्या कडेने ठिकठिकाणी थोडासा आराम करण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे.
द थिंकर (प्रतिकृती) - सांगत आहे पर्यावरण व शहर दोन्हीचा विचार करा
द थिंकर, फ्रेंच कलाकार ऑगस्टे रॉडिनचे विचारशील नग्न पुरुषाचे शिल्प, त्याच्या सर्वात प्रसिद्ध कामांपैकी एक. रॉडिनच्या हयातीत आणि नंतर अनेक आकारात अनेक संगमरवरी आणि कांस्य आवृत्त्या अंमलात आणल्या गेल्या, परंतु सर्वात प्रसिद्ध आवृत्ती म्हणजे 1904 मध्ये 6 फूट (1.8-मीटर) कांस्य पुतळा (सामान्यत: स्मारक म्हणून ओळखला जाणारा) कास्ट जो रॉडिनच्या बागेत बसला होता. पॅरिसमधील संग्रहालय. त्याच्या एकाग्र आत्मनिरीक्षणाच्या क्षणी मोठ्या स्नायूंच्या आकृतीने अनेक दशकांपासून प्रेक्षकांना मोहित केले आहे. (जालावरून साभार. गूगल भाषांतर जसेच्या तसे)
जाता जाता तलावाचे अजून एक दोन फोटो
तलावाचा परीघ बराच मोठा म्हणजे साधारण साडे तीन किमीचा आहे. रमतगमत फेरी मारण्यास जवळपास दीड तास लागला. या भागात राहणाऱ्या लोकांना एखाद्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी असाच एखादा फेरफटका निश्चितच मारता येईल .
(टीप : पक्षी जास्त दिवस दिसणार नाहीत)