Log in or register to post comments684 views तप्त तडिताघाताची दीर्घ मेघगर्जनेची मत्त सागरगाजेची जातकुळी एक ना? मोरपिसाच्या डोळ्याची खोल पाणभोवर्याची गूढ कृष्णविवराची जातकुळी एक ना? अगणित अभ्रिकांची शतकोटी शक्यतांची अनंताच्या उद्गमाची आदिमाय एक ना?