आज सकाळी मतदान करून आलो.आता वेध निकालाचे. ४ जूनला नवीन सरकार येणार.आता मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील की राहुलची लॉटरी लागणार. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील राजनीति या विषयाचे तज्ञ यावर प्रश्न टाकू शकतील.
मोदीजी म्हणतात ४०० पार. प्रशांत किशोर म्हणतात कमीत कमी २७०. योगेंद्र यादव म्हणतात एनडीएला २७०मिळणार नाही. अखिलेश म्हणतो १४२ आणि बाकी इंडी गठबंधनला. साहेब म्हणतात महाराष्ट्रात ५०:५०. पुरोगाम्यांचे म्हणणे आहे निकाल २००४ सारखा येईल. अंधभक्त ४०० स्वप्नात दंग आहे. बाकी ४ जूनला सत्य कळेल.तो पर्यन्त आपले अंदाज...