इच्छापत्र

लेक मायेची खाण,माझ्या आईची सावली
जशी झुळूक वार्‍याची, ग्रिष्माच्या काहीली

लेक माझी प्राजक्त,मंद सुगंधाची जाण
गेला घेऊन कुठे वारा, सुने झाले आंगणं

ठायी ठायी विखुरल्या, तीच्या मखमली खुणा
गोळा करता येतो,आवंढा गळ्यात पुन्हा पुन्हा

लेक माझी गुणाची, तीचा पुनर्जन्म व्हावा
बाप मी तीचा,पुनर्जन्मी तीचा लेक व्हावा.