आरोप आणि शिक्षा , एक चौकस प्रश्न "दया इसमे कूच तो गडबड है ..."

भारतात बरेचदा हि बातमी ऐक्यायला मिळते कि "अमुक अमुक राजकारणी , उद्योजक हा अमुक अमुक वर्षे कोणत्यातरी फसवणुकीचं घोटाळ्याच्या आरोपाखाली अमुक अमुक वर्षे तुरंगात होता आणि सध्या एक तर सुटला तरी किंवा पॅरोल वर सुटला
माझ्य पुढे हा प्रश्न नेहमी पडलाय कि
१) साधारणपणे गुन्हा शाबीत होऊन कोर्टातर्फे तुरंगवासाची शिक्षा सुनावली जाते आणि मग आपण असे म्हणून शकतो कि हा हा गुन्हा शाबीत झाल्यामुळे हि व्यक्ती तुरंगात आहे
२) असा खटला किंवा त्याआधी त्याचे पोलीस आणि सरकारी वकील तपस करीपर्यंत त्याला न्यालयीन कोठडी ची विनंती करतात आणि कोर्ट ती देते किंवा त्यावर काही निर्बंध लावून त्याला कोठडीत ठेवीत नाही , जर अशी न्यायालयीन कोठडी असली तर ती गुन्ह्याची शिक्षा नसते , मग प्रश्न हा कि या बातम्यांचा अर्थ काय

अ ) भुजबळ ४ वर्षे तुरंगात होते म्हणे काय? गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा मिळाली म्हणजे क्रिमिनल रेकॉर्ड आले का ती फक्त खटल्याआधीची न्यायालयीन कोठडी होती ?
ब) डी एस कुलकर्णी आणि कुटुंब २ कि काय वर्षे तुरंगात होते .. म्हणजे काय? गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा मिळाली म्हणजे क्रिमिनल रेकॉर्ड आले का ती फक्त खटल्याआधीची न्यायालयीन कोठडी होती ?

गुन्हेगार सगळ्या देशात आहेत पण येथे समाज माध्यमांना एखाद्याला पकडल्याची बातमी देताना अतिशय काळजीपूर्वक राहावे लागते , पोलिसांनी एखाद्याला पकडले तर त्याचे वर्णन "जणू आरोप सिद्ध झाला" असे करता येत नाही . न्यायालयं कोठारी असेल तर तसे स्पष्ट सांगावे लागते बरेचदा काही कारणाने न्य्यालाय असा हि आदेश देतो कि " सध्या तरी आरोपीचे नाव उघड करता येणार नाही "