डी एस के बांधकाम व्यावसायिकावर ६ वर्षांपूर्वी लोकनचे पैसे बुडवल्याचे आरोप केले गेले आणि त्यावेळी बरीच चर्चा झाली हे आठवत असेल त्याचे मालक , त्यांची पत्नी वैगरे गेली ६ वर्षे तुरंगात होते आणि नुकतेच ते जामिनावर बाहेर आहेत त्यामुळे माध्यमातून यावर चर्चा चालू आहे ... जे काय झाले ते अजून गुंतागुंतीचे होत आहे त्यात त्यांचे ग्राहक आणि ठेवीदार बरेच सर्वसाधारण मध्यम वर्गीय असल्यामुळे त्यांचे हाल चालूच आहेत , मुळात ढिसाळ कायदे , त्यांची ढिसाळ अंमलबाजवणी वैगरे आहेच
शोधपत्रकारिता आणि विशीष्ट आर्थिक घोटाळ्यात या विषयात ज्यांना रस असले त्यांचा साठी हि घटना फार रोचक आहे .. मिपावर कोणी अर्थ आणि कायदे तन्य असल्यास त्यांनी यावर प्रकाश टाकावा हि विनन्ती . माझ्य मनात आलेले काहि प्रश्न ( कृपया यात मराठी गुजराथी / राजकारण वैग्रे आणु नये, केवळ आर्थिक घोटाळा यावर लिहावे हि विनंती )
पैसे अडकले यात ३ प्रकारचे ग्राहक आहेत
१) ज्यांनी घरे विकत घेन्यासाठी आगाऊ रक्कम दिली आणि त्यांना घरे माळली नाहीत
२) ज्यांनी मुदत ठेवित गुंतवले ( डिबेनचर ) घेतले आणि त्यानना मुद्दल आणि व्याज काहीच मिळाले नाही
३) दोन्ही ज्यांनी केले ते
आणि या शीवाय
-या उद्योगाचे सेवक वर्ग आणि कदाचित पुरठवठा करणारे छोटे मोठे वयवसायिक यांची थकबाकी
- वित्तीय संस्था ज्यांनी यांना पैसे दिले होते
हे तर स्पष्ट आहे कि काहीतरी घोळ झालाय तो वेगवेगळ्या कारणांनी, कि डीएस केंच्या चुकीने किंवा त्यांनी घोटाळा केलं आहे का ?
त्यांचा अपघात , अफवा, पडेलला बाजार , हि कारणे एकीकडे दिली जातात पण ते कितीपत खरे आहे ?
- यात दोन वेगले उदोग गुंतलेले दिसतात एक "डी एस के भागीदारी" आणि दुसरी "डी एस के डेव्हलपर "
- ठेवी एका उदोयगाने घेतल्या - त्या उद्योगाला असे डिबेंचर विकण्याची परवानगी होती का?
- हा पैसा त्याच कंपनीत राहिला कि दुसऱ्या कंपनी ला दिला गेला का जिच्या नावावर जमिनी आणि डेव्हलोपमेंट चे काम होते
- आगाऊ पैसे आणि बँकांनी जर अनेक प्रोजेक्त्त ना कर्ज साठी ग्राहकांना हिरवा कंदील दिला होता तर मग त्या वास्तू पूर्ण का
गेल्या नाहीत ?
- मूळ फसवणूक झाली का? व्यासायिकांचा अंदाज चुकलला आणि धंदा गोत्यात आला ( पुरेशी विक्रि ना होणे )
आंतरजालावर डी एस के आणि ज्यांची थकबाकी आहे यांच्या मुलाखती आहेत पण सगळा गोंधळ आणि सनसनाटी बातमी हाच प्रकार, खोलात जाऊन पण सर्वसाधारण माणसाला समजेल असे कोणी काही बोलत नाही नुसता इमोशनल अत्याचार ...
आता अजून एक गुंता झालाय तो म्हनजे बुडीत कंपनी च्या ऍडमिन्सट्रेटर ने हि कंपनी कायदेशीर रित्या ४ व्यासायिकांच्य सन्स्थेला ८२६ कोटी ला विकली आणि डी एस के नि दावा केल आहे कि कंपनी कडे १६,००० कोटी ची मालमत्ता असताना ८२६ कोटी ला विकली कशी... या मागणीत दम तर आहे पण खरे काय आहे ?( हे वयसायिक बुडीत उद्योग स्वस्तात विकत घेण्याचा धंदा करतात आणि त्यात ते अमराठी म्हणून लोक कारण नसताना यात मराठी वैगरे मुद्दा आणतात , असो कोर्टाने या नवीन उद्योगाला ८२६ कोटीत घेऊन ३००० कोटी ना लगेच विकण्याचा - "फ्लीपिंग "त्यांचह्य उपक्रमाला सध्या तरी थांबवले आहे )
आता सर्वसामान्य ठेवीदारांसंबंधी संबंधी
नाण्याची एक बाजू: खाजगी कंपनीत ठेवी ठेवणे हे धोकादायक असते हे त्याना तेवहा दिसले नाही का? तेवहा परतावा जास्त मिळावा या हव्यास ( दुसरे काय) पैसे गुंतवले आणि आता का रडत आहात ?
नाण्याची दुसरी बाजू: दि एस के हा उद्योग त्याआधी बरेच वर्षे अस्तित्वात होता त्यामुले लोकाचा विश्वास बसला .. बरेच फ्लॅट घेणार ग्राहक दुहेरी ग्राहक बनले ठेवी ठेऊन .. त्यामुळे त्यांना हि १००% दोष देणे कठीण आहे
बांधकाम व्यासहयक बुडणे हे भारतात काय इतर देशात हि नवीन नाही ... फरक एवढाच कि काही देशात ग्राहक संरक्षण जास्त चांगले कायदे आहेत आणि त्याची अंमलबजावणी बऱयापैकी होते ..
असो तन्य लोकांनी यावर प्रकाश टाकावा