मदत हवी : birth certificate बीड

बीड मधून birth certificate हवे आहे.
मी सध्या पुण्यात आहे. वय 40.

SSC certificate, passport, aadhar, कॉलेज सोडतानाचा T C अशा साऱ्या साऱ्या documentsवर माझी जन्मतारीख आहे. काहींवर जन्मठिकाणही आहे. पण काही ठराविक कामासाठी birth certificate हवे आहे. ( जन्मानंतर बीडशी संबंध राहिला नाही. आणि बहुतेक शाळेत admission घेताना ते submit केल्याने सध्या माझ्याकडे नाही. अन योगायोगाने गरज पडली नव्हती आजवर)

आपल्यापैकी कुणी बीड मध्ये आहे का?

किंवा कुणाला ह्याबाबत माहिती आहे का?

दुर्दैवाने घरगुती अडचणींमुळे मला स्वतःला आत्ता पुण्याहून बीडला नुसत्या चौकशीसाठी जमेल असे दिसत नाहीये. नेमकी प्रोसेस माहिती असेल, तर त्या प्रोसेससाठी,कागदपत्रे सबमिट करण्यासाठी जाऊन येऊ शकतो.

प्लिझ, काही माहीत असेल तर अवश्य सुचवा.

दुर्दैवाने सध्या तिकडे फारशी लोक परिचयाची नाहीत. वेळेची नड आहे. ही कामे करणारी कुणी consultant, agent मंडळी मिळाली तर बरं होईल. (औपचारिकता अन कागदपत्रांची पूर्तता ह्यासाठी तिकडं जाऊ शकतो. पण सरकारी काम आहे. फॉलो अप घेऊन, तळ ठोकून करुन घ्यावे लागणार आहे. ते घरच्या परिस्थितीमुळे जमत नाहीये. )