चित्रपट - स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर: चित्रपट
'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा क्रांतिकारी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्याचा योग आला. रणदीप हुड्डा यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका साकारली आहे.

प्लेगची साथ त्यात ब्रिटिश शिपायांची क्रूरता दाखवत चित्रपट सुरुवातीलाच पकड घेतो. चित्रपट सावरकरांच्या बालपणापासून ते अंदमानच्या सेल्युलर जेलमधील क्रूर कैदेपर्यंतच्या प्रवासाचे चित्रण यात आहे. सावरकरांच्या क्रांतिकारी कारवाया, साहित्यिक योगदान, सामाजिक सुधारणा आणि हिंदुत्वाचा विचार यांचा समावेश आहे.
सुटके नंतर रत्नागिरीमध्ये राहून त्यांनी दलितांसाठी कार्य दाखवले आहे. सावरकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी प्रचंड कार्य केले. त्यांनी जातीव्यवस्थेवर टीका केली आणि दलितांना समान हक्क मिळवून देण्यासाठी लढा दिला हे व्यवस्थित पणे दाखवले आहे.

सावरकरांनी दलितांसाठी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी बालविवाह आणि विधवा पुनर्विवाहासारख्या प्रथांना प्रोत्साहन दिले. सावरकरांनी दलितांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळवून देण्यावर भर दिला. त्यांनी दलितांसाठी शाळा आणि hostels उघडली आणि त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, हे मात्र त्यात दाखवले गेले नाही. कदाचित आंबेडकर आणि सावरकर यांना एकत्र कार्य करायला संधी मिळाली असती तर किती छान झाले असते असा विचारही चमकून गेला.

सावरकरांनी 'घरवापसी' नावाची चळवळ सुरू केली. या चळवळीचा उद्देश इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात परत आणणे हा होता. हे लोक मुळचे हिंदू होते आणि त्यांना फसवून किंवा जबरदस्तीने धर्मांतरित केले गेले होते. त्यातली तुरुंगातली दृष्ये चांगली झाली आहेत. धर्मांतरीत झालेल्या व्यक्तीची हिंदू धर्मात परत घरवापसी असा सीन बहुदा चित्रपट सृष्टीत पहिल्यांदा चित्रित करण्याचा मान रणदीप हुड्डा यांना गेला असावा. यांनी सावरकरांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. इतर कलाकारांनीही चांगली कामगिरी केली आहे.

मात्र राहून राहून एक गोष्ट वाटत राहिली की सावरकरांनी मादाम कामा यांचे ऐकले असते आणि ते इंग्लंडला परत न जाता फ्रांस मध्येच राहून त्यांनी कार्य केले असते तर कदाचित भारताचा इतिहास निराळाच झाला असता.

चित्रपटगृहात जाऊन पहण्यासारखा चित्रपट आहे नक्की!

रिलीजची तारीख: २२ मार्च २०२४
दिग्दर्शक: रणदीप हुड्डा
कलाकार: रणदीप हुड्डा, साई मांजरेकर, चंकी पांडे
निर्माता: संदीप सिंह, रणदीप हुड्डा