बातमी,
बारामतीत सुनेत्रा वहिनींचा चित्ररथ, सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यातच पवार विरुद्ध पवार संघर्षाची चिन्हं - https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/baramati-loksabha-…
घ्या कविता....
पवार वि पवार
बारामती त सुप्रिया वि सुनेत्रा,
आव्हान हे बारामती शरदचंद्रा।।
नणंद विरुद्ध भावजय,
कोणाचा होणार जय??
घराघरातलं हे महाभारत,
वोटसाठी आवाज मारत!!
वर्षानुवर्षाची सुरक्षीत सीट,
अजीत सुरुंग लावणार धीट।।
एकरात केली करोडोची वांगी,
भाजपनीती का ठेचण्या नांगी।।
क्यों की लोहा लोहे को काटता,
गूढनीती 'शाह' आणि मात का !!
राजा शरदचंद्र बारामती,
ताजा अजीत-तंत्र करामती।।
उभा उमेदवार राष्ट्रवादी अजीत,
आता पहायचे कुणाची जीत।।
"देवेंद्र क्या करेगा अकेला ",
बघा घरी संघर्ष उभा केला।।
प्रश्न जनादेशाच्या तृतिय नेत्रा,
ठरवेल सुप्रिया कि सुनेत्रा ।।