काँग्रेसला गळती...
भाजपाकडे पळती ।।
चव्हाण अशोक
भाजपाकडे रोख ।।
आदर्श इमारतीत
घेतली सदनिका
आता जा जेल, वा
सत्ता मदनिका ।।
हर भ्रष्ट कृपाशंकर
धर भाजपा बंकर ।।
भाजपाकडे रीघ
बांध बो-या नीघ ।।
काँग्रेस बुडते जहाज
उंदीर उड्या पहाच !!
भाजपात माजले
असे आयाराम
निष्टावंत सतरंजी
उचला काम ।।