Log in or register to post comments971 views भासे भरजरी | चिंधी जिंदगीची जेव्हा कवितेची । हाक येते ।। हाक नि:शब्द ही। पंचप्राणांवर घालते फुंकर । हलकीशी ।। हलकेच काही । आक्रीत घडते बेडी निखळते । त्रिमितीची।। तिठा त्रिमितीचा । चिंधी ओलांडते अकस्मात होते । भरजरी ।।