Log in or register to post comments2120 views एकदा भेटून पाहू ये पुन्हा बोलून पाहू मागचे विसरुन सारे भूमिका बदलून पाहू क्रोध, मत्सर, मद वगैरे षडरिपू टाळून पाहू पावतो बाप्पा म्हणे हा चल नवस बोलून पाहू बस जरा साथीस 'नाहिद' ही गझल गाऊन पाहू