शेवग्याच्या पानांच्या पाककृती खुप दिवसांपासुन करायच्या होत्या.शेवग्याचा झाड कल्पवृक्ष प्रमाणेच झाल आहे.सांबरमध्ये शेवग्याच्या शेंगाशिवाय मज्जा नाही.वरपायला तर आवडतातच पण औषधही आहेत.आता कुठे याच्या पानांविषयी/पाल्याविषयी मी जागरूक झालेय.अतिशय कोवळे,सहज स्वच्छ होणारे हिरवेगार आहेत.याच्या तीन सोप्या पाकृ!
१.शेवगा पानांची पोडी/गन पावडर
२.शेवगा पानांचे थालिपीठ
३.शेवगा पानांची भाजी
१.शेवगा पानांची पोडी/गन पावडर
साहित्य -उडीदडाळ(२ छोटी वाटी),हरभरा डाळ(१मोठी वाटी),तीळ(१ छोटी वाटी),धने,जिरे,२ लाल मिरच्या, चवीनुसार मीठ,एक मोठी वाटी शेवगा पानं (धुवून ,कोरडी केलेली)
कृती-
१.सर्व डाळी स्वतंत्र भाजून घेतल्या.
२.तीळ इतर साहित्य एकत्र भाजले.
३.शेवगा पाला स्वतंत्र एक चमचा तेलात परतला.
४.गार झाल्यावर सर्व पदार्थ मिक्सरमधून बारीक केले.
छानपैकी मोरिंगा पोडी तयार.ईडली करतांना मिश्रणात सुकामेवा पावडर आणि तीळ भुरभुरले होते ,कमाल लागत होती.
२.शेवगा पानांचे थालिपीठ
साहित्य -भाजणीचे पीठ,ज्वारीचे पीठ,मिरची आलं लसूण पेस्ट,दोन मोठी वाटी शेवगा पानं (धुवून ,हलकेसे चिरलेली.)
कृती-
१.सर्व पिठं,शेवगा पानं,मिरची पेस्ट,हळद हिंग टाकून पीठ मळून घेतलं.
२.थालिपीठ थापून,तूप टाकत गरमागरम भाजायचे.
खरोखर चव अप्रतिम होते.
याच बरोबर शेवग्याची फुले परतून गाजर ,हरभरा कोशिंबीरीत वापरले.
३.शेवगा पानांची भाजी
साहित्य -शेवग्याची पानं,चिरलेला लसूण पाकळ्या,एक कांदा
कृती-
१.लसणाची फोडणी देत कांदा परतून घेतला.
२.लाल तिखट वापरून शेवग्याची पानं परतून घेतली,एक चमचा पोडी/शेंगदाणा कूट टाकून भाजी ३ मिनिटांसाठी वाफवली.
याशिवाय शेवग्याच्या पानांपासून भजे, कोथिंबीरीसारख्या वड्याही तयार करु शकता.
-भक्ती