जमलाय का मेनू
आली लहर केली बेसनवड्याची काळ्या रश्याची आमटी,कुस्कारायला भाकरी, भुर्रकायला कढी,तोंडी लावायला गुज्जू भरवानी मिरची लोणचे, झणझणीत कांदा काकडी ऐवजी घरात होते किवी..
बेसनवड्याची आमटी
पहिल्यांदा ५ चमचे बेसन,३चमचे ज्वारीचे पीठ घेतले.त्याच लसूण आले हिरवी मिरची जिरे यांचे वाटण घातले.मीठ, हळद, तीळ, हिंग घालून कोमट पाण्यात घट्ट मळले.थोडा वेळ बाजूला ठेवले.
काळ्या रस्सा करायला
धने, तमालपत्र भाजून घेतले.कांदा , खोबरं गॅसवर जाळी ठेवत खरपुस भाजुन घेतले.मिक्सरहून वाटण बारीक केले.
नंतर बेसनवड्या लाटून घेतल्या.हलकेच तळून घेतल्या.फोडणी केल्यावर बारीक केलेले मसाले वाटण परतून घेतले.कोमट पाणी त्यात घातले उकळी आल्यावर तळलेल्या बेसनवड्या त्यात सोडल्या.५-८ मिनिटे उकळी आल्यावर गॅस बंद केला.
- भक्ती