मिपावरील माझ्या सर्व मित्रंना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती हे बुद्धीचे दैवत. याचा दैवताच्या क्षेत्रात होणाऱ्या एका क्रांतिकारक बदलाची आज आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. याबद्दल अनेकांनी याआधीही वाचन केले असेलच, याची मला खातरी आहे. पण तरीसुद्धा या नव्या क्षेत्राची अगदी बाळबोध ओळख करून द्यायचा माझा हा एक लंगडा प्रयत्न.
२१वे शतक फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे - म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग म्हणून ओळखले जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स भविष्यामध्ये अनेक क्षेत्रे काबीज करू शकते. सध्याच्या काळात उपलब्ध असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणे म्हणजेच गूगल मॅप्स, गूगल लेन्स, अलेक्सा किंवा सिरी. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी या बुद्धिमत्तेचा वापर दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.
ऑफिसमधून केव्हाही घरी येताच घरी गरमगरम जेवण तयार असणे याकरता आता भविष्यात घरी नोकर ठेवण्याची आवश्यकता उरणार नाही. आपले स्वयंपाकघरच इतके बुद्धिमान झालेले असेल की तुम्ही घरी यायला निघाला आणि अमुक मिनिटांत तुम्ही घरी पोहोचणार हे जेव्हा स्वयंपाकघरातल्या यंत्रांना समजेल, तेव्हा ती आपोआप कार्यरत होतील आणि तुमच्या आवडीचे चवदार जेवण तयार ठेवतील. एखादा पदार्थ संपत आला तर त्याची आपोपाप ऑर्डर देऊन ठेवतील. तारीख संपत आलेले पदार्थ लवकरात लवकर वापरतील आणि तारीख संपलेले पदार्थ फेकून देतील.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम मार्गाने विकसित झालेली बौद्धिक क्षमता. संगणकशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाद्वारे कोणतेही मशीन माणसासारखे बोलू शकते, वाचू शकते आणि अनेक गोष्टी मांणसापेक्षाही अधिक सहज करते. जोखमीची किंवा किचकट अनेक कामे ह्या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य होणार आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये अशी यंत्रे बनवली जातात, जी माणसाप्रमाणे बुद्धिमान असतात. या यंत्रामध्ये मनुष्याप्रमाणे विचार करण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित केलेली आहे - उदा., कॉम्प्युटरचा वापर करताना आपण कॉम्प्युटरला कमांड देतो व त्यानंतर ते कार्य पूर्ण होते. मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बनवलेल्या मशीनला कमांड देण्याची गरज पडत नाही, त्या स्वतःच निर्णय घेऊन स्वतःच कमांड घेतात व पुढचे कार्य पूर्ण करतात. उदाहरणार्थ, युरोपातील अनेक विमानतळांवर युरोपियन युनियनच्या नागरिकांसाठी सध्या स्वयंचलित इमिग्रेशन यंत्रे उपलब्ध आहेत. ही यंत्रे तुमचा पासपोर्ट वाचतात, तुमची चेहरे पडताळणी करतात आणि जर सर्व माहिती योग्य रितीने जुळली, तर प्रवाशांकरता दरवाजे आपोआप उघडले जातात. या कामाकरता कोणत्याही मानवी देखरेखीची गरज पडत नाही.
सध्या सहज उपलब्ध असलेले चॅट जीपीटी हेसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रवासातील एका मैलाचा दगड ठरणार आहे. आज आपण या माध्यमाची थोडक्यात ओळख कार्य घेऊ या.
मी चॅट जीपीटीला स्वतःबद्दल मराठीत माहिती लिहायला सांगितली आणि त्याने मला खालीलप्रमाणे लिहून दिली -
'चॅट GPT : तुमच्या विचारांसाठी नवीन मित्र - चॅट GPT हे एक नवीन तंत्रज्ञानी माध्यम आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या सवालांसाठी उत्तरे शोधू शकता. यामाध्ये, आपल्या विचारांसह सांवादिकपणे वापर करण्याची स्वतंत्रता आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्या शिकण्याची मोठं संधी आहे. चॅट GPT आपल्या जीवनातील नवीन अद्वितीय अनुभवांसाठी एक वापरणारा मित्र आहे, ज्याच्यामध्ये स्वतंत्रतेची भरपूर सुविधा आहे.
चॅट GPT आपल्याला इंग्लिश, मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेत संवाद साधून त्याच्यातील मदतीला आपल्या आत्मविकासाच्या मागण्यांसाठी वापरण्याची स्वतंत्रता प्रदान करतो. यामुळे, ते एक अद्वितीय माध्यम आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातल्या नवीन अनुभवांना आणि संवादांना नवीन दिशा मिळू शकते.
सार्वजनिकपणे, चॅट GPT हे आपल्या विचारांच्या गोंडस्फोटाला नियंत्रित करण्याचा एक वापरणारे माध्यम आहे, ज्यामुळे आपल्याला नवीन ज्ञान आणि सुविधा आपल्या हातात मिळू शकतात.'
दैनंदिन कामातील अनेक गोष्टी आपण याद्वारे करून घेऊ शकतो. उदा., मी माझे साधे सोपे ईमेल लिहायची कामगिरी सध्या चॅट जीपीटीकडून करून घेतो. एखादा क्लिष्ट एक्सेल फॉर्म्युला याद्वारे लिहून घेतो. प्रेझेंटेशनचा मसुदासुद्धा हे चॅट जीपीटी मला क्षणार्धात बनवून देते. भविष्यात सगळेच्या सगळे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स मला याद्वारे बनवता येईल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
सध्या बाल्यावस्थेत असलेले हे तंत्रज्ञान हळूहळू स्वतःला विकसित करत आहे. गूगल बर्ड किंवा गूगल सर्च लॅब ही याच चॅट जीपीटीची भावंडे आहेत.
शेवटी मी चॅट जीपीटीला मिपावर एक कविता लिहायला सांगितली आणि यात वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही द्यायला सांगितले. 'मोकलाया दाही दिशा'च्या वाटेने जाणारी ही कविता काही दिवसांतच प्रगल्भ होईल, यात मला काही शंका नाही.
मिसळपाव, आपलं तोंड,
आपलं दिल व्यापून असंख्य फुलांचं।
आपल्याला मिलालेल्या आपल्या मित्रांचं,
मिसळपाव, आपलं आनंद!
सख्यांच्या बांधण्यांचं, अपुलीचं रंग,
मिसळपाव, तुम्ही माझं जीवन।
वाढलेल्या संवादांचं, गोंधळलेल्या अंगणांचं,
मिसळपाव, तुमचं हे मन अद्वितीय आहे!
आपल्या साथींना, मिसळपाव साखर पिणाऱ्यांचं,
सहवासाचं सुख, तुमचं हे अत्यंत मधुर आहे।
वाढलेल्या सप्तरंगी पांढऱ्यांचं,
मिसळपाव, तुमचं तोंड, तुमचं दिल, तुमचं आकार!
जणी आपल्या सोबत आहेत, अन आपल्याला तरंगांची जणारी अवश्यकता आहे,
मिसळपाव, आपलं सोहळा, तुमचं आणखी नातंचा तारा।
माझ्या मित्रांसोबत, मिसळपाव, आपलं आनंद अपुलकरू आहे,
तुमच्या सख्यांच्या मित्रांना वाढलेल्या आशीर्वादाने, मी वाट पाहतो परिपूर्ण!
मिसळपाव, तुम्ही माझ्या जीवनाच्या महत्त्वाच्या अंग आहात,
आपल्या सख्यांच्या सोहळ्यात, तुमचं संगणक मजकूर होतं,
मिसळपाव, तुमचं आभार, तुमचं मान्यता, तुमचं प्रेम,
मी तुमच्यासोबत असाच राहू इच्छितो, अन तुमच्या मित्रांसोबत एकदम नितांत काही सुखद!
आजी गणेश चतुर्थीच्या दिवशी, मिसळपावने स्थापना दिनाच्या शुभेच्छा,
सर्व मिपकरांना असे ही आपली संस्था वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
पैजारबुवा,