कामावरुन मधल्या सुट्टीत घरी जेवणासाठी येणार्या चावट रसिकांसाठी..
=============================================================
किचनमधुनि मला उचलुनि आत धन्याने नेले..
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
दुपार होती घरात नव्हते कुणीही अजिबात.
केला होता दुष्ट सख्याने..भलता चावट बेत..
कशास फसवु..मी ही तेव्हा होते मोहरलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
विसरुन गेलो..दुपार होती अथवा आहे रात..
विसरुन गेलो कधी गुंफले हातामध्ये हात..
इतके स्मरते त्याच्यासंगे मी ही थरथरलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
पुढचे क्षण मग होऊन गेले..मंतरलेले सारे..
उधाण आले, लाटांमध्ये मुक्त बुडाले तारे..
अमृतलहरीत मजेत होते गलबत भरकटलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
इश्श..राहिली गालावरती त्याच्या माझी टिकली.
मीच लाजुनि नंतर हसुनि हळुच पापणी मिटली.
ध्यान गडबडीत तसेच ..अरे देवा.. कामावरती गेले..
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
+कानडाऊ योगेशु