झटपट कप केक्स

साहित्य - २ पाकिटे bourbon biscuits, चिमूटभर खाण्याचा सोडा, २ कप दुध, कॅडबरी चोकलेट किंवा डार्क चोकलेट .

कृती - सर्व बिस्किटे मिक्सरमधून ग्राईंड करून घ्या. बिस्किटांचा भुगा एका बाऊल मध्ये घेऊन त्यात अंदाजे दुध मिसळत राहा. आप्प्यांप्रमाणे सरबरीत मिश्रण करा. मिश्रण २ मिनिटे चांगले फेटून घ्या. खाण्याचा सोडा घालून हलक्या हाताने पुन्हा एकदा मिश्रण हलवा. आप्पे पात्राला तुपाने ग्रीस करुन मिश्रण अर्ध्यापर्यंत भरा. कॅडबरी चोकलेटचा किंवा डार्क चोकलेटचा एक चौकोनी तुकडा ठेऊन पुन्हा थोडे मिश्रण ओतून आप्पे पात्र व्यवस्थित भरून घ्या.मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे बेक करा. झटपट कप केक्स तयार

मिनी कप केक्स

केक उकलल्यावर आत melted चोकोलेट असल्याने याला मिनी चोको लावा केक सुद्धा म्हणू शकता.

 चोको लावा केक