संदर्भ
आज केरळ स्टोरी ह्या चित्रपटाच्या कथेचा प्रत्यक्ष अनुभव पुणे येथे आला. माहेश्वरी समाजातील एक मुलगी नाव निकिता लोहीया गाव बीड जिल्ह्यातील एका खेड्यातून पुण्यामध्ये शिकण्यासाठी येते काय आणि 47 वर्षीय विवाहित दोन मुलं असलेल्या मुस्लिम माणसाच्या प्रेमात पडते काय आणि धर्मांतर करून लग्न करते आणि आई वडिलांना ह्याची जराही कल्पना नाही. आई वडिलांनी मुलीला गावा कडे बोलावून घेतले आणि कुणकुण लागली म्हणून परत पाठवली नाही. म्हणून त्या मुलीने त्या मुस्लिम माणसाच्या सांगण्यावरून आई वडिलांकडून जीवाला धोका आहे आणि इस्लाम धर्म मी माझ्या मर्जीने स्वीकारलेला आहे असा व्हिडीओ पाठवला. त्या मुस्लिम माणसाने त्या विडिओ चा आधार घेत पुणे कोर्टात Crpc Sec. 97 खाली अर्ज केला, आणि तिला हजर करण्याबाबत आदेश मिळवला. तदनंतर आज दि.01/07/2023 रोजी तिला पुणे कोर्टात हजर करण्यात आले, त्या वेळी आपल्या हिंदू वकील बांधवाना कळताच सगळ्यांनी कोर्टात धाव घेतली, व जोरदार हरकत नोंदवत युक्तिवाद केला. परंतु मुलगी सज्ञान असल्याने कोर्टाने हरकत नामंजूर करत मुलीला तिच्या मुस्लिम पतीच्या घरात जायचे असल्यास जाऊ शकते, असा आदेश केला. त्यावेळी मुलीचे आईवडील अक्षरश रडत होते, परंतु त्या मुलीवर काहीएक परिणाम झाला नाही व ती तिच्या मुस्लिम पतीच्या घरी निघून गेली, आणि हतबल आईबाबा तिला बघत राहिले. त्या वेळी माहेश्वरी समाज चे वकील बंधू आणि भगिनी सर्व ऍडवोकेट
सूचित मुंदडा, केदारनाथ मणियार, अमित राठी, शीतल भुतडा, पियुष राठी, प्रवीण चांडक, मयुरी कासट, पूजा झंवर याना बातमी कळताच ताबडतोब कोर्टात आले व सर्वानी *त्या मुलीला समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु त्याचा देखील काही एक परिणाम झाला नाही.* काय होत आहे समाजात आपली मुलं मुली काय करत आहेत कुठे आहेत कोणासोबत आहेत ह्याची विचारपूस करून त्यांच्यावर लक्ष ठेवणे व त्यांना भरकटण्यापासून रोखणे हे आपल्या हातात आहे. आज एक घटना समोर आली उद्या या सारख्या आणखी घटना घडू नयेत ह्या बाबत काळजी घ्यावी लागणार आहे.
त्या मुस्लिम माणसाची पहिली पत्नी gate no. 4 बाहेर हिला सोडवण्याकरीता थांबून होती.
2 मुस्लिम स्त्रिया ह्या मारवाडी पोरीला सासरी नांदायला घेऊन गेल्या.
Don't treat it as something like SECULARISM or else...
Be Serious and Cautious
या पोस्ट मधील काही नाव मुद्दाम डिलीट केली आहेत.
--फेसबुक वरून--
------------------------------------------------------------------
ही बातमी बर्याचजणांनी वाचली असेल. हे इतके ब्रेनवॉशिंग कसे होऊ शकते? ते सुद्धा शिकलेल्या प्रौढ मुलीबाबत? हा वशीकरणाचा प्रकार असावा का? वशीकरण खरंच असतं का? हा या मुलीचा स्वत:चा निर्णय आहे असे तिने सांगितले असले तरी असा निर्णय तिने भानावर राहुन घेतला असावा का? ताईत बांधून वशीकरण केले जाते असे म्हणतात. जोपर्यंत तो अंगावर बांधलेला असेल तोपर्यंत ती वश झालेली असते म्हणे. हे खरे असावे का? विज्ञान याबाबत काय म्हणते?