स्टेजवरची वज्रमूठ,
मेजवरती ठरली झूट,
मतपेटीतलं भूत,
मेले नाही।।
सुपारी फुटायच्या आत,
बुंदी खायची घाई,
मतदारच बाप अन् आई
विसरले।।
कमळ विकसले,
काका आकसले,
नाना प्रकाशले,
बुध्दिबळे।।
भांडे लपवले ताका,
बोबडले ते काका,
नाही राहीला धाका,
पक्ष-फूटी।।
सत्तेसाठी ता ता थय्या,
भाजप व विरोधक एकशय्या
'समान नागरी' ची नैय्या
पार पडो।।