विरोधकांची भाजपविरोधी एकजूट

केंद्रात भाजप-प्रणित सरकार दोन वेळा बसल्यावर विरोधी पक्ष कासावीस झाले आहेत. भाजपविरोधी एकजुटीने प्रयत्न करणे तत्वतः मान्य होऊन दोन तीन पक्षांचे नेते भेटून याबाबत मार्ग काढण्यासाठी बैठकी घेत होते. तरी ठोस असा जाहीरनामा किंवा मसुदा पुढे आला नव्हता.
आता या आठवड्यात मात्र सर्व विरोधी पक्षांचे मुख्य नेते पाटण्यात भेटले. पुढे शिमला येथे पुन्हा भेटण्याचं ठरलं.
आतापुरता ठराव म्हणजे १)भाजपला एकजुटीने विरोध करणे,२)गरिबी निर्मूलन करणे आणि बेरोजगारी कमी करणे यावर एकमत झाले.
नेत्यांनी विशेष मतेही मांडली. त्यात
*कॉंग्रेस पक्ष देशासाठी बलिदान करायला तयार .
*देशात लोकशाही वाचवणे, भाजपची हुकुमशाही थोपवणे.
*गेली काही वर्षे एकमेकांच्या विरुद्ध लढलेले आता एकत्र यायचे ठरवले आहे.

इत्यादी मुद्दे आले.
सभा व्यवस्थितपणे पार पडली.
---------------
या अगोदर जे एकजुटीचे प्रयत्न करण्यासाठी बैठकी झाल्या त्यात बहुतेक विरोधी पक्षाचा पंतप्रधान म्हणून चेहरा कोण हा मुद्दा होता बहुतेक. तो या सभेत घेतला नाही . हाच कळीचा मुद्दा आहे. पुढचा कोणत्या पक्षाने कुठे जागा लढवायची यावर चर्चा होईल.
---------
तर हे भाजप विरुद्ध इतर सारे पक्ष हे साध्य होणार का यासाठी हा धागा 'राजकारण' सदरात उघडत आहे.
राजकीय विश्लेषण अभ्यासपूर्ण मत काहीच मांडलेले नाही.
माझ्या मते पंतप्रधान कोण यावर बराच वेळ जाईल असे वाटते. श्री/मा. केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी ही आघाडीची नावं होती. केजरीवालांच्या नावास मतदारांचाही पाठिंबा मिळेल बहुतेक.
एकूण आपली मते मिपाचे धोरण अनुसरून मांडावीत. धाग्याचा विषय 'ही एकजूट यशस्वी होणार का आणि भाजपची खेळी काय असेल.'