कोर्टाचे नरो वा कुंजरोवा (अर्थात डबल ढोलकी)

खोकेबाज धोकेबाज ।
इतरा म्हणत गद्दार!
स्वत: दिला पदभार।
सोडोनिया ।।

ठाकरेंनी जरी घातले,
सर्वोच्च कोर्टा साकडे,
पाऊल पडले वाकडे,
भलतेची।।

अननूभवी कुणी बनला ।
निवडणूकीस न उभारता।
मालमत्ता अर्ज न भरता।
मुख्यमंत्री।।

शाह- नानाने मात दिली।
भाज्यपाल जरी चूकले।
महाविकासआघाडी झूकली।
यामुळेचि।।

आत्मविश्वास अभाव?
अल्पमताची चाहूल?
कि अल्पमतीची हूल।
राजीनामा!!

बंडखोरांची ती सहल।
हाॅटेल डोंगर ती हिरवळ।
16अपात्र म्हणे झिरवळ।
योग्य होते?!

हेटाळले तुम्ही ज्यांना।
अलीबाबा,चाळीस चोर।
ठरले काळीज शिरजोर।
शिंदेशाही।।

आपण लाचारपणे।
केला असंगासी संग।
व सोडला भगवा रंग।
खुर्चीसाठी।।

नाव गेले,चिन्ह गेले।
संपली राजकीय सदी?
हिंदूत्व,पक्ष,वारसा-गादी ।
हाराकीरी।।

कारकीर्द इकडे पणाला।
मारला मोक्यावरी चौका।
आता नाही काही धोका।
शिंदे यांना।।